मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : IPL नेच टीम इंडियाचा घात केला? ऑस्ट्रेलियाच्या विजयाची Inside Story

T20 World Cup : IPL नेच टीम इंडियाचा घात केला? ऑस्ट्रेलियाच्या विजयाची Inside Story

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला आहे, याचसोबत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे.

    दुबई, 15 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (Australia vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला आहे, याचसोबत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने 5 वनडे वर्ल्ड कप जिंकले होते, त्यामुळे आता त्यांच्या खात्यात तब्बल 6 वर्ल्ड कप ट्रॉफी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा गेम प्लान ऑस्ट्रेलिया यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार नव्हती, कारण गेल्या काही काळात त्यांची टी-20 फॉरमॅटमधली कामगिरी निराशाजनक झाली होती. बांगलादेश दौऱ्यावरही ऑस्ट्रेलियाचा टी-20 सीरिजमध्ये पराभव झाला होता. दुसरीकडे अनेकांनी टीम इंडियाला (Team India) वर्ल्ड कप विजयाचं प्रबळ दावेदार मानलं होतं. याला कारणही आयपीएलचं (IPL) देण्यात आलं होतं. भारतीय खेळाडू आयपीएलसारखी जगातली सगळ्यात मोठी लीग खेळून लगेच टी-20 वर्ल्ड कप खेळत असल्यामुळे भारतीय टीम धोकादायक असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी मांडलं होतं, पण टीम इंडिया सुपर-12 स्टेजलाच स्पर्धेबाहेर फेकली गेली. टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं कारण सततचं क्रिकेट आणि खेळाडूंना मिळत नसलेली विश्रांती असल्याचं सांगितलं गेलं. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही हे मान्य केलं. मग टी-20 वर्ल्ड कपआधी ज्या आयपीएलवर विश्वास दाखवला त्यानेच टीम इंडियाचा घात केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे तर या चर्चांना अजून जोर आला आहे, कारण ऑस्ट्रेलियाच्या टीममधले बहुतेक खेळाडू आयपीएल खेळलेले नाहीत. टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे जे 11 खेळाडू मैदानात उतरले, यातले फक्त 2 खेळाडूच आयपीएल 2021 खेळले होते, यामध्ये मॅक्सवेल आरसीबकडे तर जॉश हेजलवूड चेन्नई सुपरकिंग्सच्या टीममध्ये होता. डेव्हिड वॉर्नरला सनरायजर्स टीममधून डच्चू देण्यात आला होता, तर मिचेल मार्श आणि एरॉन फिंच आयपीएल खेळले नव्हते. स्टीव्ह स्मिथ दिल्लीच्या टीममध्ये असला तरी त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. स्टॉयनिसही दिल्लीच्या टीममध्ये होता, पण फिटनेसमुळे तोदेखील कमी सामने खेळला. पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणाऱ्या मॅथ्यू वेडला आयपीएल लिलावात कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही. आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या कोलकात्याच्या पॅट कमिन्सने आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमधून माघार घेतली. तर स्टार्क आणि एडम झम्पादेखील आयपीएल खेळले नाहीत, त्यामुळे खेळाडूंना मिळालेली योग्य विश्रांती ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं कारण ठरलं का? याचा विचार बीसीसीआयला करावा लागणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Australia, Ipl, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या