Home /News /sport /

अखेर Team India चा पराभव! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांची बाजी

अखेर Team India चा पराभव! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांची बाजी

शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढत ऑस्ट्रेलियन महिलांनी विजय खेचून आणला. बेथ मूनीच्या नाबाज 125 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं (Australia Women vs India Women) मोठं वाटणारं आव्हान पार केलं.

  मॅके, 24 सप्टेंबर : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियन महिलांनी 5 गडी राखून भारतावर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढत ऑस्ट्रेलियन महिलांनी विजय खेचून आणला. बेथ मूनीच्या नाबाज 125 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं (Australia Women vs India Women) मोठं वाटणारं आव्हान पार केलं. ताहलिया मॅकग्राने 74 धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली. भारताने प्रथम फलंदाजी करताना दिलेले 274 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने पार करत दुसरा एकदिवसीय सामना आपल्या नावावर केला. भारताकडून झुलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्रकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताकडून स्मृती मंधानाने केलेली 86 धावांची दमदार खेळी विजय मिळवण्यासाठी अपुरी ठरली. स्मृतीशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष हिने 44 धावांची खेळी केली, त्यामध्ये तिनं 3 चौकार आणि एक षटकारही ठोकला. सुरुवातीला टॉस गमावल्यानंतर भारतीय टीम पहिल्यांदा बॅटींगला उतरली. स्मृतीनं शफाली वर्मा (Shafali Verma) सोबत पहिल्या विकेटसाठी 74 रनची दमदार पार्टनरशिप केली. शफाली मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच 22 रन काढून आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन मिताली राज (Mirhali Raj) 8 रन काढून रन आऊट झाल्यानं भारतीय टीमला मोठा धक्का बसला. हे वाचा - आमिर खानचा ‘Lagaan’ होता चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट
  मिताली पाठोपाठ यास्तिका भाटिया देखील झटपट आऊट झाल्यानं भारताची अवस्था 3 आऊट 95 अशी झाली होती. त्यानंतर स्मृतीनं विकेटकिपर रिचा घोष (Richa Ghosh) सोबत चौथ्या विकेट्ससाठी 76 रनची पार्टनरशिप केली. या दरम्यान स्मृतीनं तिच्या वन-डे कारकिर्दीमधील 19 वं अर्धशतक देखील पूर्ण केलं. ती शतक झळकावेल असं वाटत असतानाच 86 रन काढून आऊट झाली. स्मृतीनं 94 बॉलमध्ये 11 फोरच्या मदतीनं ही खेळी केली.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, India vs Australia

  पुढील बातम्या