टॉस जिंकण्यासाठी अनोखा फंडा, एकाच संघाचे 2 कर्णधार मैदानात

टॉस जिंकण्यासाठी अनोखा फंडा, एकाच संघाचे 2 कर्णधार मैदानात

नाणेफेक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने दोन कर्णधार मैदानात उतरवले. यामागचं कारणं ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यात फलंदाजीवेळी भारताचे दोन फलंदाज एकाच वेळी मैदानात उतरण्याच्या तयारीत होते. सुदैवाने ही गोष्ट लक्षात आली आणि पंत मैदानात उतरला. पण आता चक्क नाणेफेक करायला तीन कर्णधार मैदानात आल्याचा प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका महिला संघाच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेवेळी हे घडलं. मालिकेतील पहिलाच सामना रविवारी सिडनीत झाला. यावेळी नाणेफेकीसाठी 3 कर्णधार मैदानावर दिसले.

लंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू हिच्यासोबत ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि नाणेफेक करण्यासाठी कर्णधार म्हणून एलिसा हिली मैदानावर आली होती. यामागे लेनिंगनं असलेलं कारणंही नंतर सांगितलं. ऑस्ट्रेलिया संघांचे नेतृत्व जरी लेनिंगकडे असलं तरी पहिल्या सामन्यासाठी केवळ नाणेफेक करण्यासाठी एलिसा हिली उतरली होती.

लेनिंग म्हणाली की, आतापर्यंत नाणेफेकीत माझं रेकॉर्ड खराब आहे. तुम्हाला माहिती नसेल पण हे खरं आहे. म्हणूनच माझ्यासोबत एलिसा आली. तिनं नाणेफेक केली आणि कौल आमच्या बाजूने आला. लेनिंगला नाणेफेकीत खूपच कमी यश मिळालं आहे. इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिकेत फक्त दोन वेळा नाणेफेक जिंकली आहे. तर याशिवाय विंडीजविरुद्ध एकदा नाणेफेक जिंकली होती.

क्रिकेटच्या मैदानात असं पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधी एखाद्या कर्णधाराच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल लागत नाही म्हणून दुसऱ्या लकी खेळाडूला नाणेफेकीला पाठवण्याचा प्रकार घडला आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वे यांच्यातील सामन्यावेळी फाफ डु प्लेसिच्या जागी जेपी ड्यूमिनी नाणेफेकीसाठी उतरला होता. विशेष म्हणजे ड्यूमिनी प्लेइंग इलेव्हनमध्येही नव्हता.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: australia
First Published: Sep 30, 2019 08:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading