Aus vs SL : कुटुंबासाठी कायपण! भावाच्या वरातीसाठी स्टार क्रिकेटपटूनं सोडलं मैदान

Aus vs SL : कुटुंबासाठी कायपण! भावाच्या वरातीसाठी स्टार क्रिकेटपटूनं सोडलं मैदान

भावाच्या लग्नासाठी स्टार क्रिकेटपटूनं घेतली मालिकेतून माघार.

  • Share this:

सिडनी, 29 ऑक्टोबर : क्रिकेट म्हटलं की देशाचे प्रतिनिधित्व आले, त्यामुळं खेळाडूंना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. त्यात मालिकांचे दौरे असतील तर महिनाभर घरापासून आणि कुटुंबीयांपासून लांब राहावे लागते. मात्र एका स्टार क्रिकेटपटून भावाच्या लग्नासाठी चक्क आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात कांगारूंनी जबरदस्त फलंदाजी केली. मात्र, या मालिकेतून जलद गोलंदाज मिशेल स्टार्क यानं माघार घेतली आहे. स्टार्कच्या जारी बिली स्टेनलेक किंवा सीन एबोच या खेळाडूंना संधी मिळू शकते. बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0नं आघाडी घेतली आहे.

वाचा-सौरव गांगुलीचे क्रिकेटपटूंना मोठं दिवाळी गिफ्ट! युवा खेळाडू होणार मालामाल

दरम्यान मिशेल स्टार्कनं आपल्या भावाच्या लग्नासाठी या मालिकेतून माघार घेतल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तसंस्थेनं दिली आहे. स्टार्कच्या भावाचे बुधवारी लग्न असल्यामुळं कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला. दरम्यान कर्णधार पॅट कमिन्सनं स्टार्कच्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.

वाचा-BREAKING : कॅप्टन कोहलीच्या जीवाला धोका, दहशतवाद्यांकडून धमकी

वाचा-टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, बांगलादेशचे खेळाडू सोडणार भारत!

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात कांगारूंनी आक्रमक फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियानं तब्बल 134 धावांनी या सामन्यात बाजी मारली. डेव्हिड वॉर्नरनं शतकी खेळी केली तर, मॅक्सवेल आणि फिंच यांची आतषबाजी पाहायला मिळाली. या सामन्यात वॉर्नरनं टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये पहिली शतकी खेळी केली. तर, वर्ल्ड कप 2019नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियानं टी-20 सामना खेळला. त्यामुळं या विजयाचा त्यांना टी-20 वर्ल्ड कप 2020मध्ये विशेष फायदा होऊ शकतो.

First published: October 29, 2019, 12:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading