‘…तर मी स्मिथचं थोबाड फोडलं असत’, शोएब अख्तरच्या धक्कादायक विधानानं खळबळ; पाहा VIDEO

पाकिस्तानच्या रावळपिंडी एक्सप्रेसचे धक्कादायक विधान.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 06:05 PM IST

‘…तर मी स्मिथचं थोबाड फोडलं असत’, शोएब अख्तरच्या धक्कादायक विधानानं खळबळ; पाहा VIDEO

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट जगातातला सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून ओळखला जातो. आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये आपल्या दमदार खेळीच्या जोरावर स्मिथनं विराट कोहलीलाही मागे टाकले. स्मिथनं नुकत्याच झालेल्या पाकिस्तान विरोधातल्या टी-20 सामन्यात 80 धावांची खेळी केली. स्मिथच्या या खेळीच्या जोरावर स्मिथनं ऑस्ट्रेलियाला 7 विकेटनं विजय मिळवून दिला.

मात्र स्मिथच्या या खेळीवर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरनं एक धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. शोएबनं आपल्या यु-ट्युब चॅनलवर, “मी जर स्मिथला गोलंदाजी करत असलो असतो तर नक्कीच त्याच्या चेंडू तोंडावर फेकून मारला असता”, असे धक्कादायक विधान केले आहे. तसेच, शोएबनं स्मिथकडे फलंदाजीची पध्दत किंवा टेकनिक नसली तर तो प्रभावी फलंदाज आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

वाचा-अनिल कुंबळेचा वारसदार; 15व्या वर्षीच केली 'परफेक्ट 10'ची कामगिरी!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाक संघाला मिळालेल्या पराभवावर शोएबनं आपल्या व्हिडीओमध्ये मत व्यक्त केले होते. यात अख्तरनं, “मला माहीत नाही तो कसा चांगली फलंदाजी करतो. त्याच्याकडे फलंदाजीची योग्य पध्दत नाही आहे. तरी तो चांगली फलंदाज आहे. त्यामुळं जर मी त्याला गोलंदाजी करत असतो तर नक्कीच त्याला मारण्याचा प्रयत्न केला असता”, असे विधान केले.

वाचा-मॅच फिक्सिंग, विराटच्या संघातील खेळाडूसह तिघांना अटक

Loading...

पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तर हा रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 247 विकेट घेतल्या आहेत. पाकविरोधात झालेल्या सामन्यात स्मिथनं 51 चेचंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 80 धावा केल्या होत्या. त्यामुळं शोएबनं पाकच्या गोलंदाजांवर टीका करत स्मिथला थांबवणे असंभव असल्याचे मतही व्यक्त केले आहे.

वाचा-RCBच्या तिजोरीत खडखडाट, IPL लिलावात बसणार मोठा झटका

स्मिथ कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह असला तरी टी-20मध्ये त्याला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याची सरासरी 64.56 आहे. तर एकदिवसीयमध्ये हीच सरासरी 41.41 आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...