VIDEO : त्रिशतकी खेळीनंतर वॉर्नरच्या हेल्मेटवरून भरमैदानात लहान मुलांमध्ये झाला राडा

VIDEO : त्रिशतकी खेळीनंतर वॉर्नरच्या हेल्मेटवरून भरमैदानात लहान मुलांमध्ये झाला राडा

वॉर्नरच्या हेल्मेटवरून झालेला राडा पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पाहा हा VIRAL VIDEO.

  • Share this:

अ‍ॅडलेड, 02 डिसेंबर : पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये होत असलेल्या सामन्यात वॉर्नरनं जबरदस्त फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 589 धावांचा डोंगर उभा केला. यात डेव्हिड वॉर्नरनं आपल्या आक्रमक फलंदाजीनं पहिले त्रिशतक पूर्ण केले. वॉर्नरच्या या कामगिरीमुळे आता तो ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज वॉर्नर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरनं 154 धावांची शतकी खेळी केली होती. तर, दुसऱ्या सामन्यात 335 धावांची नाबाद खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. वॉर्नरनं 418 चेंडूत 335 धावा केल्या. यात 39 चौकार आणि एका षटकारानं ही कामगिरी केली. वॉर्नरनं कसोटी क्रिकेटमध्ये 23 शतक , 2 दुहेरी शतक आणि आता एका त्रिशतक पूर्ण केले आहे.

वॉर्नरच्या या ऐतिहासिक खेळीची प्रमुख कारण म्हणजे त्याचे हेल्मेट. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र तसेच काहीसे घडले. पाकिस्तानविरुद्ध विक्रमी तिहेरी शतक नोंदविल्यानंतर डेव्हिड वॉर्नरनं आपले हेच खास हेल्मेट गॅलरीमध्ये बसलेल्या मुलांना दिले. मात्र, काही सेकंदांनंतर हेल्मेटवरून या लहानमुलांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. वॉर्नरनं ज्या मुलाला हेल्मेट दिले त्या मुलाच्या शेजारी बसलेल्या मुलांमध्ये हे भांडण सुरू झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरसाठी हा सामना खूप खास आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड येथे खेळल्या जाणार्‍या दोन कसोटी सामन्यांच्या दुसर्‍या सामन्यात तिहेरी शतक झळकावले. वॉर्नरने या सामन्यात नाबाद 335 धावांची खेळी केली आणि अ‍ॅडलेडमध्ये सर डॉन ब्रॅडमनने केलेल्या सर्वाधिक 299 धावांच्या विक्रमाला मागे टाकले.

First published: December 2, 2019, 7:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading