क्रिकेटच्या मैदानात फलंदाज झाला धावपटू! 21 किमी धावत केला रेकॉर्ड

क्रिकेटच्या मैदानात फलंदाज झाला धावपटू! 21 किमी धावत केला रेकॉर्ड

क्रिकेटच्या मैदानात रचला गेला धावण्याचा रेकॉर्ड!

  • Share this:

अ‍ॅडलेड, 02 डिसेंबर : अखेर आज पाकिस्तानचा भयानक ऑस्ट्रेलिया दौरा संपुष्टात आला आहे. टी -20 मालिकेनंतर यजमान संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. पहिला कसोटी सामन्यात 5 धावांनी विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियानं 48 धावांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकला नमवले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तीन टी-20 सामन्यात क्लिन स्विप दिला होता. मात्र डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं उभारलेल्या डोंगराचा पाठलाग पाक संघाला करता आला नाही.

या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली. या कसोटी सामन्यात त्रिशतकी खेळी करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. वॉर्नरनं या सामन्यात 335 धावांची तुफानी खेळी केली. याआधी पाकच्या फलंदाज अजहर अलीनं ही कामगिरी केली होती. या आपल्या खेळीत वॉर्नरनं 39 चौकार आणि एक षटकार लगावला होता. यामुळे वॉर्नरच्या फिटनेसचे जगभरात कौतुक केले जात आहे.

वाचा-क्रिकेटमध्ये खेळला जातोय ‘अजित पवार’ शॉट, तुम्ही तरी पाहिलात का?

डॉन ब्रॅडमनला टाकले मागे

पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या आणि अंतिम सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अ‍ॅडलेडच्या या मैदानावर सुमारे 21 किलोमीटर धावला. वॉर्नरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट डाव खेळताना ऑस्ट्रेलियन कसोटी इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाच्या वैयक्तिक धावा केल्या याचबरोबर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. पाकिस्तानविरुद्धच्या त्रिशतकी खेळीच्या आधी कसोटीमध्ये वॉर्नरने 253 धावांची खेळी होती. ही खेळी त्याने न्यूझीलंडविरुद्ध 2015मध्ये पर्थ येथे केली होती. अ‍ॅडलेट कसोटीत मोहम्मद अब्बासच्या चेंडूवर चौकार लावत त्याने त्रिशतक झळकावले. ही त्रिशतकी खेळी करताना वॉर्नरने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. अ‍ॅडलेट मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. त्यांनी 88 वर्षांपूर्वी म्हणजेच 1931-1932 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानावर 299 धावांची खेळी केली होती. मॅथ्यू हेडननंतर वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. वॉर्नरने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या फिटनेसचे दिले आहे.

वाचा-विजयाच्या आधीच केला जल्लोष आणि 4 चेंडूत गमावला सामना

असा धावला वॉर्नर

पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडिलेमध्ये झालेल्या कसोटीत वॉर्नरने (डेव्हिड वॉर्नर) दुपारी 2 वाजून 7 मिनिटांनी फलंदाजी करण्यात सुरात केली. यानंतर त्याने पाकिस्तानी गोलंदाजांवर जोरदार फटकेबाजी केली आणि भव्य तिहेरी शतकी खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने 127 षटके फलंदाजी केली आणि नाबाद परतला कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या करत वॉर्नरने इतिहास घडवला. त्याने 519 मिनिटे फलंदाजी केली. वॉर्नरने 389 चेंडूत त्रिशतक झळकावले. यात 37 चौकारांचा समावेश होता. या सामन्यात वॉर्नर 418 चेंडूत नाबाद 335 धावा केल्या. यात 39 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता.

वाचा-पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी झाली टीम इंडियाची घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या