ऑस्ट्रेलियामध्ये मैदानात दिसला ‘धोनी’ अवतार, स्टम्पिंगचा हा VIDEO पाहाच

ऑस्ट्रेलियामध्ये मैदानात दिसला ‘धोनी’ अवतार, स्टम्पिंगचा हा VIDEO पाहाच

धोनीला मिस करत असाल तर हा VIDEO एकदा पाहाच.

  • Share this:

मेलबर्न, 29 डिसेंबर : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं मोठ्या फरकानं विजय मिळवत ही कसोटी मालिकाही खिशात घातली. मात्र या सामन्यात एका प्रसंगाने भारतीय चाहत्यांना धोनीची आठवण करून दिली.

या सामन्यात न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावादरम्यान संघाचा कर्णधार टिम पेनने किवी फलंदाज हेन्री निकोलसला मोठ्या वेगाने स्टम्पिंग केले. भारतीय संघाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी ज्या जलद गतीनं फलंदाजांना बाद करतो, तसाच काहीसा प्रकार या सामन्यात दिसला. त्यामुळं टीम पेनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाव व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयसीसीनं आपल्या ट्विटरवर अपलोड केला आहे.

वाचा-LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं रागात आपल्याच सहकाऱ्याला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

दरम्यान बॉक्सिंग डेच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊडवर झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 247 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. याशिवाय ही मालिकाही जिंकली आहे. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत एकही सामना बॉक्सिंग डे दिवशी गमावलेला नाही.

वाचा-कॅमेऱ्यामागे माझे बाबा आहेत, क्रिकेटच्या मैदानातला चिमुकलीचा VIDEO VIRAL

वाचा-ऋषभ पंत, सरफराज आणि झिव्हाचे मजेशीर प्रसंग, हे मजेशीर VIDEO पाहून पुन्हा हसाल

लाईव्ह सामन्यात हरवला चेंडू

दरम्यान या सामन्यात अनेक मजेशीर प्रसंग घडले. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करताना बोल्टच्या बॅटलाही न लागला चेंडू मैदानातून गायब झाला. सामना सुरू असताना फलंदाजासह सर्वांची शोधाशोध सुरू झाला. या प्रसंगाचा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेंडू सापडल्यानंतर यष्टिरक्षक टिम पेन, स्टिव्ह स्मिथ स्लिपवर उभा, पॉईंटवर उभा असलेले नॅथन लिऑन यांनी बॉल वेगवेगळ्या दिशेने पाहण्यास सुरवात केली. सुरुवातीला चेंडू कोठे गेला हे कॅमेरा देखील पकडू शकला नाही. मात्र चेंडू सापडल्यानंतर सर्वच खेळाडू हसू लागले. त्याच्यासोबत फलंदाजी करणारा नील वॅग्नर हसणे थांबवू शकला नाही, तेव्हा नॅथन लायनही हसला. फलंदाजीदरम्यान बोल्टने 8 धावा केल्या आणि तो मिशेल स्टार्कचा बळी ठरला.

वाचा-153 किमी वेगानं आलेल्या बाउन्सरनं मोडले फलंदाजाचे बोट, मैदानातच झाला रक्तबंबाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2019 04:14 PM IST

ताज्या बातम्या