सिडनी, 06 जानेवारी : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाला क्लीन स्वीप देत आयसीसी कसोटी स्पर्धेत आपले स्थान मजबूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने-न्यूझीलंड यांच्यात झालेली तिसरा कसोटी सामना कांगारूंनी 279 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात केवळ 136 धावांमध्ये सामना जिंकण्यासाठी आव्हान दिले.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मार्नस लबूशेनेच्या दुहेरी शतकावर 454 धावा केल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 256 धावांवर बाद झाला आणि यजमानांनी 198 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने 416 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते आणि दुसरे डाव घोषित करताना 217 धावा केल्या.
वाचा-'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, अभिमान वाटावा असा VIDEO
मात्र या सामन्यात एक आश्चर्यचकित करणार प्रसंग घडला. नॅथन लायन (Nathan Lyon) या सामन्यात पाच विकेट घेतल्या. मात्र त्याने टाकलेल्या स्पिन बॉलनं फलंदाज हैराण झाले. यातील एका व्हिडीओमध्ये फलंदाज बॉलिंग पाहूनच घाबरला. हा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला आहे. नॅथनच्या स्पिनवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रावलनं घाबरत एक शॉट खेळला. मात्र बॅटची कडा लागून टिम पेननं कॅच घेतला.
वाचा-सुरुवातीला सर्वांनी वेड्यात काढलं पण नंतर याच वेड्याने इतिहास घडवला
Jeet Raval called for the review, but it couldn't save him #SpecsaverCricket@SpecsaversAU | #AUSvNZ pic.twitter.com/cR7egBkxcR
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2020
वाचा-BCCI ने भारताची लाज काढली! खेळपट्टी सुकवण्यासाठी वापरली इस्त्री आणि हेअर ड्रायर
यानंतर रावलनं डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. टीव्ही पंचांनी पाहिले की चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करत होता. जीत रावललाही त्याच्या फलंदाजीचा चेंडू कधी आणि कसा लागला हे समजू शकले नाही. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर टीम इंडिया पहिल्या स्थानावर कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.