Home /News /sport /

अजब निवड! 21 चेंडूत 100 धावा वसूल करणाऱ्या खेळाडूलाच ठेवलं संघाबाहेर

अजब निवड! 21 चेंडूत 100 धावा वसूल करणाऱ्या खेळाडूलाच ठेवलं संघाबाहेर

टीम ऑस्ट्रेलियाने जे खेळाडू वर्षभर क्रिकेटपासून दूर आहेत अशांची निवड केली पण ज्याने दोन आठवड्यांपूर्वी केलेल्या वादळी खेळी केली त्याला मात्र बाहेर बसवलं.

    मेलबर्न, 05 फेब्रुवारी : एखाद्या फलंदाज फॉर्ममध्ये असेल तर त्याची निवड संघात जवळपास निश्चित मानली जाते. त्यातही त्यानं 79 चेंडूत 147 धावांची वादळी खेळी केली असेल तर निवड करण्यात कसलीच अडचण नसावी. पण ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने अशा खेळाडूला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मार्कस स्टोइनसला संघात जागा मिळू शकली नाही. बीग बॅश लीगमध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांना संघात घेतलं आहे. गेल्या वर्षी अॅशेस मालिकेपासून मार्श आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं जानेवारी 2018 मध्ये अखेरचा एकदिवसीय आणि ऑक्टोंबर 2018 मध्ये टी20 सामना खेळला होता. मॅक्सवेलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर मानसिक तंदुरुस्तीचे कारण देत क्रिकेटपासून दूर गेला होता. मॅथ्यू वेडलासुद्धा दोन्ही संघात संधी मिळाली. तर सीन अॅबॉट आणि झाय रिचर्डसन यांचा टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. फॉर्मच्या आधारावर निवड केली जात असेल तर मार्कस स्टोइनसला सर्वात आधी संघात स्थान मिळालया हवं. स्टोइनसने बिग बॅश लीगमध्ये 15 सामने खेळले. त्याने 612 धावा केल्या होत्या. यात 5 अर्धशतकांसह एका शतकाचा समावेश होता. 12 जानेवारीला त्याने सिडनी सिक्सर्सविरुद्ध स्टोइनसने 79 चेंडूत नाबाद 147 धावांची खेळी केली होती. यात त्याने 13 चौकार आणि 8 षटकार खेचले होते. म्हणजेच त्यानं फक्त 21 चेंडूतच 100 धावा वसूल केल्या होत्या. अशी धडाकेबाज खेळी केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या संघात त्याला स्थान मिळालं नाही. कर्णधार विराट कोहलीची 'दादा'गिरी, अर्धशतकासह नोंदवले हे विक्रम एकदिवसीय संघ : अॅरॉन फिंच, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, अॅश्टन एगर, जोश हेजलवूड, मार्नस लॅब्युशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा. टी20 टीम : अॅरॉन फिंच, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, सीन अॅबॉट, अॅश्टन एगर, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन,स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा. ...अन् 'माही'वर आली पाणीपुरी बनवण्याची वेळ, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या