अरेरे! 150 ओव्हर केली फिल्डिंग पण बॅंटिंगमध्ये पहिल्याच बॉलवर झाला आऊट, पाहा हा भन्नाट व्हिडीओ

900 चेंडू केली फिल्डिंग आणि दोन दिवसांची बॅटिंग मिळाली तर झाला मजेशीर प्रकारे आऊट.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 02:28 PM IST

अरेरे! 150 ओव्हर केली फिल्डिंग पण बॅंटिंगमध्ये पहिल्याच बॉलवर झाला आऊट, पाहा हा भन्नाट व्हिडीओ

सिडनी, 15 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात अॅडन मार्करमनं 156 ओव्हरपर्यंत मैदानात फिल्डिंग केली. मात्र फलंदाजी करताना मात्र फक्त 2 चेंडू खेळत तो माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान असा हा पहिला प्रकार नाही. शेफील्ड शील्डमध्येही असाच प्रकार घडला. तब्बल 900 चेंडूंपर्यंत फिल्डिंग केल्यानंतर फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

शेफील्ड शील्डनं (Sheffield Shield) विक्टोरिया विरोधात झालेल्या सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाता फलंदाज जॅक विदरॉल्ड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जलद गोलंदाज जेम्स पेटिनसनं पहिल्या चेंडूवर जॅकला बाद केलेय फलंदाजीसाठी येण्याआधी जॅक जवळ जवळ 150 ओव्हरपर्यंत फिल्डिंग करत होता. त्यानं 35 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2157 धावा केल्या आहेत. याच खेळाडूनं बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात शतक लगावले होते.

वाचा-भरमैदानात खेळाडू खेळले कॅच-कॅच! क्रिकेटच्या इतिहासातला विचित्र झेल, पाहा VIDEO

वाचा-भारतीय क्रिकेटमध्ये घराणेशाही, शहांच्या मुलासह 'या' मंत्र्याचा भाऊ मैदानात!

दोन्ही संघांनी केले 600हून अधिक धावा

या सामन्यात व्हिक्टोरिया संघानं सर्वात आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी 6 विकेट गमावत 616 धावांवर डाव घोषित केला. यावेळी सलग दोन दिवस फिल्डिंग करताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू थकून गेले होते. मात्र विदरॉल्ड बाद झाल्यानंतर साऊथ ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. 6 विकेट गमावत त्यांनी 671 धावा उभ्या केल्या. यात 5 फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली.

वाचा-आता दरवर्षी होणार टी-20चा थरार, क्रिकेट चाहत्यांसाठी ICCने घेतला मोठा निर्णय

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...