मुंबई, 06 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी नागपूरमध्ये खेळली जाणार आहे. या कसोटी आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडीओ शेअर करून भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने एक प्रश्न विचारत ऑस्ट्रेलियाचं तोंड बंद केलं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला एडलेड कसोटीमधला व्हिडीओ शेअर केलाय. त्यात भारताचा संघ ३६ धावात गुंडाळला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनला एक इमोजी टाकत ३६ धावांवर ऑल आउट असं लिहिलं होतं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गुरुवारपासून सुरू होतेय. यावर आकाश चोप्राने फक्त दोनच शब्दाच प्रश्न विचारला.
हेही वाचा : पाकिस्तानकडून भारत हरल्यास, मोदी गायब होतील आणि..., जावेद मियाँदाद सोडली पातळी
आकाश चोप्राने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या व्हिडीओचं ट्विट रिट्विट करत म्हटलं की, त्या मालिकेची स्कोअरलाइन काय आहे? आकाश चोप्राने म्हटलं की,आणि त्या मालिकेची स्कोअर लाइन काय होती? इतकंच विचारायचं होतं.
And the series score-line? #JustAsking https://t.co/u0X43GgS8k
— Aakash Chopra (@cricketaakash) February 6, 2023
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केलेला व्हिडीओ एडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतला आहे. त्या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त ३६ धावांवर ऑल आउट झाली होती. भारताने ही कसोटी ८ विकेटने गमावली होती. मात्र त्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त कमबॅक करताना पुढच्या ३ पैकी २ कसोटी जिंकून मालिका खिशात टाकली होती. आकाश चोप्राने याच मुद्द्यावरून प्रश्न विचारत ऑस्ट्रेलियाला उत्तर दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket