क्रिकेटपटूंसाठी पंतप्रधान पाण्याच्या बाटल्या घेऊन धावले मैदानात!

क्रिकेटपटूंसाठी पंतप्रधान पाण्याच्या बाटल्या घेऊन धावले मैदानात!

क्रिकेटचा सामना सुरु असताना पंतप्रधानांनी खेळाडूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन स्वत: मैदानात धाव घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा चाहते घुसखोरी करतात. सामना सुरू असताना ऐनवेळी चाहते मैदानात घुसल्यानं सुरक्षा व्यवस्थेची धावपळ उडते. पण आता कॅनबरात झालेल्या एका सामन्यात देशाचे पंतप्रधान स्वत: खेळाडूंसाठी पाणी घेऊन दाखल झाले.

कॅनबरात प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन स्वत: ड्रिंक्स घेऊन मैदानावर पोहचले. ओव्हलवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 27 ऑक्टोबरला अॅडलेडवर होणार आहे. त्याआधी श्रीलंका आणि प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात सराव सामना झाला. यावेळी लंकेचा फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन मैदानावर पाण्याच्या बाटल्या घेऊन आले.

प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सराव सामन्यात प्राइम मिनिस्टरने एक गडी राखून विजय मिळवला. लंकेनं पहिल्यांदा खेळताना 8 बाद 130 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना प्राइम मिनिस्टर इलेव्हनकडून हॅरि नेल्सनने 50 चेंडूत 79 धावांची वेगवान खेळी केली. लंकेकडून ओशादा फर्नांडोने सर्वाधिक 38 धावा केल्या.

VIDEO : जेसीबी घेऊन उधळला गुलाल, सेनेच्या मंत्र्याला पराभूत केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Oct 25, 2019 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading