मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 मध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने दिलं 'गिफ्ट'

IPL 2021 मध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने दिलं 'गिफ्ट'

Australia Team for West Indies Tour: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) खराब कामगिरी केलेल्यांचीही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

Australia Team for West Indies Tour: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) खराब कामगिरी केलेल्यांचीही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

Australia Team for West Indies Tour: आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) खराब कामगिरी केलेल्यांचीही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

मुंबई, 18 मे: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाने (Australia vs West Indies) सोमवारी टीमची घोषणा केली आहे. 23 जणांच्या या टीममध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) खराब कामगिरी केलेल्यांचीही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) दोन खेळाडूंना स्थान मिळालं, रिले मेरेडिथ (Riley Meredith) आणि झाय रिचर्डसन (Jhye Richardson) वेस्ट इंडिजविरुद्ध खेळतील. या दोन्ही फास्ट बॉलरची आयपीएलमध्ये धुलाई झाली.

पंजाबचा फास्ट बॉलर रिले मरेडिथला पंजाबने 8 कोटी रुपयांना विकत घेतलं. मेरेडिथ जलद बॉलिंग करण्यासोबतही त्याचा बाऊन्सरही चांगला आहे, पण आयपीएलमध्ये मात्र त्याला यश आलं नाही. मेरेडिथने 5 मॅचमध्ये फक्त 4 विकेट घेतल्या, तसंच त्याचा इकोनॉमी रेटही 9.94 होता. पंजाबने झाय रिचर्डसनवर 14 कोटी रुपयांची बोली लावली, पण त्यालाही 3 सामन्यांमध्ये 3 विकेटच मिळाल्या. रिचर्डसननेही 10 रनच्या इकोनॉमी रेटने रन दिले. या खराब कामगिरीनंतरही मेरेडिथ आणि रिचर्डसन यांना ऑस्ट्रेलियन टीममध्ये संधी देण्यात आली.

RCB च्या खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक, मानसिक तणावामुळे निर्णय

मेरेडिथ आणि रिचर्डसनशिवाय मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि मोईसेस हेनरिक्स (Moises Henriques) यांचीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी निवड झाली आहे. हेनरिक्स आयपीएल 2021 मध्ये हैदराबादकडून 3 मॅच खेळला, यात त्याला 8 च्या सरासरीने फक्त 16 रनच करता आल्या, तसंच त्याला एकच विकेट घेता आली.

क्रिकेटमध्ये नवं चक्रीवादळ, वॉनच्या 'मॅच फिक्सर' वक्तव्यावर सलमान बटचा पलटवार

दिल्ली कॅपिटल्सचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसचीही ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली आहे. स्टॉयनिसने आयपीएल 2021 मध्ये 8 सामने खेळून फक्त 2 विकेट घेतल्या, तसंच त्याला 71 रन करता आल्या.

ऑस्ट्रेलियन टीम

एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी, स्टीव स्मिथ, एश्टन एगर, जेसन बेहरडॉर्फ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड, मोइसेस हेनरिक्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरिडिथ, जॉश फिलीपी, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तनवीर संघा, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, स्वेपसन, एंड्रयू टाय, मैथ्यू वेड, एडम झम्पा

First published: