पाकमध्ये क्रिकेटला येणार अच्छे दिन? श्रीलंकेनंतर 'हा' संघही जाणार दौऱ्यावर

पाकमध्ये क्रिकेटला येणार अच्छे दिन? श्रीलंकेनंतर 'हा' संघही जाणार दौऱ्यावर

पाकिस्तानमध्ये 2009मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकही सामना घरच्या मैदानावर खेळला गेला नव्हता.

  • Share this:

दुबई, 21 सप्टेंबर : पाकिस्तानमध्ये 2009मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकही सामना घरच्या मैदानावर खेळला गेला नव्हता. आता श्रीलंका संघानं तब्बल 10 वर्षांनी तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्याची तयारी आता दाखवली आहे. 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर हा दौरा होणार आहे. दरम्यान आता 2022मध्ये आता आणखी एक संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास उत्सुक आहे.

श्रीलंकेनंतर आता ऑस्ट्रेलिया संघानं पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं अद्याप यास दुजोरा दिलेला नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्सने सुरक्षा संबंधी चिंता व्यक्त केली आहेत. पाकिस्तानात खेळाडूंच्या सुरक्षावर कोणताही खतरा येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यानंतरच याबाबत निर्णय घेणार आहे. 2009 साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जीवघेणा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी श्रीलंका टीमच्या बसवर गोळीबार केला होता. यात 6 खेळाडू जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर सर्व संघांनी पाकिस्तान दौरा न करण्याचा निर्णय घेतला होता.

वाचा-140 दिवसात बदललं जोफ्रा आर्चरचं नशीब, विराट कोहलीपेक्षा जास्त पगार

ऑस्ट्रेलियाच्या संघानं 1998नंतर पाकिस्तानात दौरा केलेला नाही. त्यामुळं सुरक्षा मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर 2022मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौरा करू शकतो. रॉबर्ट्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे पुनरागमन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

वाचा-पाकसोबत कुणी येईना खेळायला, आफ्रिदीनं पुन्हा ओकली भारताबद्दल गरळ!

श्रीलंकादौऱ्यातून काही खेळाडूंनी घेतली माघार

2009 साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जीवघेणा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी श्रीलंका टीमच्या बसवर गोळीबार केला होता. यात 6 खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळं श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी या दौऱ्यातून सुरक्षेच्या कारणामुळे माघार घेतली आहे. दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. सध्या श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा सगळ्यात चर्चेचा विषय आहे. श्रीलंकेच्या टॉप खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. त्यानंतर नव्या संघाची निवड करण्यात आली. अखेर गुरुवारी श्रीलंका बोर्डानं नव्या संघाची घोषणा केली. त्यानंतर आफ्रिदीनं भारतावर आरोप केले आहेत. आफ्रिदीच्या मते, श्रीलंकेतील खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळं त्यांना पाकिस्तानात खेळण्याची भीती वाटत असल्याचे मत व्यक्त केले. आफ्रिदीनं नुकत्याच एका मुलाखतीत, भारतात खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रिमीअर लीगमुळे श्रीलंकेतील खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्याल तयार नाही आहेत. आफ्रिदीनं भारतावर आरोप करत, “श्रीलंकेच्या खेळाडूंवर आयपीएलमधील मालकांचा दबाव आहे. मी मागच्यावेळी अनेक श्रीलंकेच्या खेळाडूंशी बातचित केली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की खेळाडूंना पाकिस्तानमध्ये यायचे आहे. मात्र पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळल्यास आयपीएलचा करार संपू शकतो, ही भिती या खेळाडूंना आहे”, असे सांगितले.

वाचा-धवनला झोपेत बडबडण्याची सवय? रोहितने शेअर केला VIDEO

VIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2019, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading