Home /News /sport /

आणखी एका टीममध्ये शिरला कोरोना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॉझिटिव्ह

आणखी एका टीममध्ये शिरला कोरोना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसने (Corona Virus) आणखी एका टीममध्ये शिरकाव केला आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू आणि श्रीलंकेच्या प्रशिक्षक तसंच सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

    मेलबर्न, 12 जुलै: कोरोना व्हायरसने (Corona Virus) आणखी एका टीममध्ये शिरकाव केला आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू आणि श्रीलंकेच्या प्रशिक्षक तसंच सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही काळापासून ऑस्ट्रेलियन टीमबाहेर असलेला पीटर हॅण्ड्सकॉम्ब (Peter Handscomb) याला कोरोना झाला आहे. यामुळे हॅण्ड्सकॉम्ब लँकशायरविरुद्धच्या काऊंटी मॅचमधून बाहेर झाला आहे. 30 वर्षांचा हॅण्ड्सकॉम्ब मिडलसेक्सचं नेतृत्व करत आहे, पण तो रविवारी चॅम्पियनशीपच्या ग्रुप-दोन च्या मॅचमध्ये खेळू शकला नाही. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हॅण्ड्सकॉम्बला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन' मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार हॅण्ड्सकॉम्बऐवजी आयर्लंडच्या टीम मुर्टाग याला मिडलसेक्सचं कर्णधार करण्यात आलं आहे. मिडलसेक्सने लँकशायरविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या दिवशी 3 विकेट गमावून 280 रन केले होते. हॅण्ड्सकॉम्बला या सत्रात रन करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. मिडलसेक्ससाठी 13 इनिंगमध्ये त्याला 50 रनपर्यंतही पोहोचता आलं नव्हतं. हॅण्ड्सकॉम्बने त्याची अखेरची टेस्ट मॅच भारताविरुद्ध जानेवारी 2019 साली सिडनीमध्ये खेळली होती. तर जुलै 2019 साली इंग्लंडविरुद्ध तो अखेरची वनडे खेळला होता. इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजआधी इंग्लंड टीममधल्या (England vs Pakistan) 7 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे त्यांना संपूर्ण टीम बदलावी लागली. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या बॅटिंग प्रशिक्षक ग्रॅण्ड फ्लॉवर आणि आणखी एका सहकाऱ्याला कोरोना झाला, यामुळे भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातली सीरिजही पुढे ढकलण्यात आली. इंग्लिश काऊंटीमधली केंट टीममध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. एका खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सगळ्यांना 10 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. केंट 9 जुलैला सरेविरुद्ध किया ओव्हलमध्ये खेळत होती. यानंतर 10 जुलैला टीममधल्या एकाला कोरोना झाल्याचं समोर आलं. यामुळे युके सरकारच्या नियमानुसार टीममधले सगळे जण आयसोलेट झाले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Australia, Coronavirus, Cricket, England

    पुढील बातम्या