ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा प्रताप, तब्बल 4 हजार 738 दिवसांनी केली अजब कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा प्रताप, तब्बल 4 हजार 738 दिवसांनी केली अजब कामगिरी

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेननं क्रिकेटच्या इतिहासात एक अजब कामगिरी केली आहे.

  • Share this:

सिडनी, 12 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेननं क्रिकेटच्या इतिहासात एक अजब कामगिरी केली आहे. टीम पेननं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 13 वर्षांचा दुष्काळ संपवत चांगली खेळी केल आहे. 2006मध्ये 21 वर्षांचा असताना टीमनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 4 हजार 738 दिवसांनी शतकी कामगिरी केली आहे. शेफील्ड शील्ड स्पर्धेत टीमनं 13 वर्षांनंतर शतकी खेळी केली.

टीमनं 2009मध्य पर्थच्या मैदानावरच शतकी कामगिरी केली होती, त्यानंतर आता पुन्हा 13 वर्षांनी याच मैदानावर त्यानं शतक केले. पेननं 209 चेंडूत 121 धावांची खेळी केली. पेननं आपल्या खेळीमध्ये 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. पेन शिवाय या सामन्यात संघाचा सलामीवर जोर्डन सिल्कनं 44, डुलननं 23 धावांची खेळी करत संथ सुरुवात करून दिली. त्यानंतर मॅथ्यू वेडनं 40 तर कालेब ज्वेलनं 52 धावा केल्या. या खेळाडूंच्या खेळीनं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघानं 337 धावा केल्या.

वाचा-टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर! चाहत्यानं भरमैदानात रोहितच्या अंगावर मारली उडी

13 वर्षांनंतर केलेल्या शतकी खेळीमुळं पेन सुखावला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असूनही पेनला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आली नव्हती. पेनच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आलेली अॅशेस मालिका बरोबरीत सुटली. ऑस्ट्रेलिया येत्या काळात पाकिस्तान आणि न्युझीलंड विरोधात टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

वाचा-आधी टीम इंडियानं नाकारलं; आता लगावले विराट, रोहितपेक्षा जलद द्विशतक

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतकी कामगिरी नाही

बऱ्याच काळानंतर कसोटी कामगिरी करूनही टीम पेननं काही खास जल्लोष दाखवला नाही. ऑस्ट्रेलियाकडून टीमनं 26 कसोटी सामने खेळले आहे. मात्र त्याला एकही शतक लगावता आलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 6 अर्धशतक लगावले आहेत. याचबरोबर त्यानं 31.34च्या सरासरीनं 1 हजार 164 धावा केल्या आहेत. अॅशेस मालिकेतही विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं 10 डावांमध्ये 180 धावा केल्या.

वाचा-चाहत्यांसाठी खुशखबर! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार धोनी

कुस्ती 'अशां'सोबत होत नाही, हातवारे करून पवारांनी फडणवीसांना फटकारले, पाहा हा VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: October 12, 2019, 5:58 PM IST
Tags: tim paine

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading