ऑस्ट्रेलियानं भारताचा 21 धावांनी केला पराभव

संपूर्ण टीम 313 रन्सवर आऊट झाली. भारताकडून केदार जाधवने सर्वाधिक 67 धावा केल्यात.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 10:50 PM IST

ऑस्ट्रेलियानं भारताचा 21 धावांनी केला पराभव

28 सप्टेंबर : सलग तीन एकदिवशी सामने जिंकल्यानंतर आज चौथ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. आॅस्ट्रेलियाने भारताचा 21 रन्सने पराभव केलाय.

भारत आणि आॅस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडिअमवर झालेल्या एकदिवशीय सामन्यात आॅस्ट्रेलियाने टाॅस जिंकत पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. वाॅर्नर 124 रन्स तर फिंचने शानदार 94 रन्स केले. वाॅर्नर आणि फिंच या ओपनिंग जोडीने पहिल्या विकेटसाठी विक्रमी 231 धावांची भागिदारी उभी केली. दोघांच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर निर्धारीत 50 ओव्हरर्समध्ये आॅस्ट्रेलियाने 5 बाद 334 धावांचा डोंगर उभा केला.

विजयासाठी 335 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची दमछाक झाली. संपूर्ण टीम 313 रन्सवर आऊट झाली. भारताकडून केदार जाधवने सर्वाधिक 67 धावा केल्यात. तर रोहित शर्माने 65  धावांची खेळी केली. आॅस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्यात. आॅस्ट्रेलियाच्या चौथ्या एकदिवशीय सामन्यात विजयामुळे भारताचं व्हाईटवाॅशची संधी हुकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...