मेलबर्न, 28 डिसेंबर: ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या अॅशेस कसोटी क्रिकेट मालिका (Ashes Series) आपल्या नावावर केली आहे. कंगारुंच्या संघाने इंग्लंडला एक(Australia vs England) डाव आणि 14 धावांनी पराभूत केले. पहिल्या डावामध्ये इंग्लंडने 185 धावा केल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 267 धावा करत 82 धावांची आघाडी मिळवली. त्यामुळेच हा सामना रंगतदार होईल असे वाटले होते. पण स्कॉट बोलॅडच्या भेदक बॉलिंगमुळं इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 68 धावांमध्ये गुंडाळला गेला.
32 वर्षीय वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅड (Scott Boland) ने पदार्पणात रेकॉर्डब्रेक ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावात केवळ 7 रन देत 6 विकेट घेतल्या. त्याच्याव्यतिरीक्त मिचेल स्टार्कने तीन आणि कॅमरन ग्रीन ने एक विकेट घेतली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) फार चांगले काही खेळू शकला नाही. या मालिकेतील पाच सामन्यापैकी पहिले तीन सामने (AUS vs ENG Test Series) जिंकले.
तिसऱ्या दिवशीच इंग्लंडच्या संघाने यजमान संघासमोर गुडघे टेकल्याचे पहायला मिळाले. पाहुण्या संघाचा दुसरा डाव अवघ्या 68 रनांमध्ये गुंडाळला. कर्णधार जो रुट आणि बेन स्ट्रोक्स या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. रुटने सर्वाधिक म्हणजे 28 रन तर स्ट्रोक्सने 11 रन केल्या. स्टॉक बोलंडने सात रनांच्या मोबदल्यात सहा खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, तर स्कार्टने तीघांना माघारी धाडत इंग्लंडच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम केले.
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 31 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. मिचेल स्टार्कने जॅक क्रॉलीला विकेटच्या मागे पाच धावांवर झेलबाद केले. डेव्हिड मलान पाचव्या षटकात खाते न उघडता बाद झाला. पहिली कसोटी खेळणाऱ्या स्कॉट बोलंडने एका धावात दोन बळी घेतले. त्याने हसीब हमीद (7) आणि जॅक लीच (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
ऑस्ट्रेलियाने उपाहारापूर्वी नॅथन लियॉन (10), मार्नस लॅबुशेन (1) आणि स्टीव्ह स्मिथ (16) यांच्या विकेट्स गमावल्या आणि पहिल्या दिवसाची धावसंख्या 4 बाद 61 अशी केली. सलामीवीर मार्कस हॅरिस (76) याने ट्रॅव्हिस हेड (27) सोबत 60 धावांची भागीदारी केली. त्याला हेड स्लीपवर जो रूटने झेलबाद केले. दहा धावांनंतर हॅरिसने जेम्स अँडरसनची विकेट गमावली. अँडरसनने 23 षटकांत 33 धावा देत चार बळी घेतले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.