भारतासाठी आनंदाची बातमी! वर्षभरापूर्वी हुकलेलं सुवर्ण परत मिळणार

भारतासाठी आनंदाची बातमी! वर्षभरापूर्वी हुकलेलं सुवर्ण परत मिळणार

2018 मध्ये आशियाई गेम्समध्ये भारताला 400 मीटर मिश्र रिले प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.

  • Share this:

जकार्ता, 21 जुलै : गेल्या वर्षी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताने रौप्य पदक पटकावलं होतं. आता ते सुवर्ण पदक होणार आहे. भारताने मिश्र रिले प्रकारात रौप्य पदक मिळवलं होतं. बहरीनने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. मात्र अॅथलेटिक्स इंटेग्रिटी यूनिटने बहरीनच्या एका धावपटूवर चार वर्षांची बंदी घातली. तसेच 24 ऑगस्ट ते 26 नोव्हेंबर 2018 दरम्यानचे सर्व निकाल रद्द केले. यामुळे भारताला फायदा झाला.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे 28 ऑगस्ट 2018 मध्ये मिश्र रिले फायनल झाली होती. यात बहरीनच्या संघाने 3:11:89 अशी वेळ नोंदवली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय संघाने 3:15:71 या वेळेत शर्यत पूर्ण केली होती. भारतीय संघात हिमा दास, मोहम्मद अनस, एमआर पूवाम्मा आणि अरोकिया राजीव हे धावपटू होते.

शर्यतीनंतर भारताने एक तक्रार दाखल केली होती. बहरीनच्या एका धावपटूने शर्यतीदरम्यान हिमाच्या वाटेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. भारताचे हे अपिल फेटाळून लावल्यानं रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.

बहरीनच्या बंदी घालण्यात आलेल्या धावपटूने 400 मीटर मधअयेसुद्धा सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यात भारताची अनु राघवन चौथ्या क्रमांकावर होती. आता तिला कांस्य पदक मिळू शकते.

भारताने गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदकं पटकावली होती. पदक तक्त्यात भारत 8 व्या क्रमांकावर होता. यात एक कांस्य आणि सुवर्ण वाढलं तरी भारताच्या रँकमध्ये फारसा फरक पडणार नाही.

SPECIAL REPORT : औरंगाबाद मॉब लिंचिंग प्रकरण : होता 'गणेश' म्हणून वाचला 'इम्रान'!

First published: July 21, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading