'हिमा'लयाएवढी कामगिरी! 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO

'हिमा'लयाएवढी कामगिरी! 19 व्या वर्षी 19 दिवसांत 5 सुवर्ण, पाहा VIDEO

ढिंग एक्सप्रेस अशी ओळख असलेली भारताची धावपटू हिमा दासने गेल्या 19 दिवसात 5 सुवर्ण पटकावल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाहा तिच्या शर्यतीचे व्हिडिओ.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : भारताची धावपटू हिमा दासने तिची सोनेरी घोडदौड कायम राखत गेल्या 19 दिवसात 5 सुवर्ण पदकांवर नाव कोरलं. शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील मेस्टो नाड मेटुजी ग्रां प्रीमध्ये 400 मीटर स्पर्धेत सुवर्ण पटकावलं. आता तिच्या या शर्यतीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हिमानं 400 मीटर अंतर 52.09 सेकंदात पार केलं. दुसऱ्या नंबरवर भारताची वीके विस्मया होती तीने 52.48 सेकंदात हे अंतर पूर्ण केलं. कुमार विश्वास यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे की, तु धाव हिमा जोरात धाव, कोट्यवधी भारतीय मुलींच्या स्वप्नांना घेऊन धाव, त्या प्रत्येक भारतीय मुलीच्या वाट्याचं सगळं तुला जिंकायचं आहे. त्यांच्याशिवाय भारताचे राष्ट्रपति रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही हिमाचे अभिनंदन केलं आहे.

हिमाने झेक प्रजासत्ताकमध्ये टबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत 17 जुलैला 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यात 23.25 सेकंदात अंतर पार करत आपली कामगिरी सुधारली होती.

13 जुलैला क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्समध्ये 200 मीटर स्पर्धेत तिसरं सुवर्ण पटकावलं होतं. यात तिने 200 मीटर अंतक 23.43 सेंकदात पार केलं होतं. हिमाने जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. पोलंडमधील कुटने अॅथलेटिक्स मीटमध्ये 7 जुलैला आणि पोझनान अॅथलेटिक्स ग्रां प्रीमध्ये 2 जुलैला सुवर्ण पदक पटकावलं होतं.

हिमा दासने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. आतापर्यंत वर्ल्ड ज्युनिअर अॅथलेटिक्समध्ये भारताला तीनच पदके मिळवता आली आहेत. यामध्ये सीमा पुनिया, नवजीत कौर धिल्लन यांना थाळीफेकमध्ये कांस्यपदक तर भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. धावपटू म्हणून सुवर्णपदक मिळवणारी पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये ती एकमेव आहे. फ्लाइंग सिख मिल्खा सिंग आणि सुवर्णकन्या पी.टी. उषा यांनाही अशी कामगिरी करता आली नव्हती.

2018 नंतर यावर्षी हिमाला दुखापतीने आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होता आलं नव्हतं. 2019 मध्ये पहिल्यांदाच तिनं जुलै महिन्यातील 2 तारखेला ट्रॅकवर पाऊल ठेवलं आणि पहिलं सुवर्ण जिंकलं. त्यानंतर गेल्या 19 दिवसांत 200 मीटरमध्ये 4 आणि 400 मीटरमध्ये 1 सुवर्णपदक पटकावलं. या यशानंतरही तिनं आपली मातीशी नाळ कायम राखली आहे. स्पर्धेदरम्यान आसामला महापुराचा तडाखा बसल्याचं तिला समजलं. तेव्हा आपलं वेतन तिनं पुरग्रस्तांसाठी दिलं आणि इतरांना मदतीचे आवाहनही केलं.

भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

First published: July 22, 2019, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading