भारताच्या 16 वर्षीय वेटलिफ्टरची विश्वविक्रमी कामगिरी

भारताच्या 16 वर्षीय वेटलिफ्टरची विश्वविक्रमी कामगिरी

16 वर्षीय जेरेमीने यूथ वर्ल्ड आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील विक्रम मोडीत काढला.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल : भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिन्नुंगाने रविवारी झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात ग्रुप बीमध्ये तीन प्रयत्नात 130 आणि 134 किलो वजन उचलले. या कामगिरीसह त्याने यूथ वर्ल्ड आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील विक्रम मोडीत काढला. मात्र, त्याला स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले.

वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमीच्याच नावावर आधीचा विक्रम होता. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला 131 किलो वजन उचलून विक्रम नोंदवला होता. 16 वर्षांच्या जेरेमीने क्लीन अँड जर्क प्रकारात दोन प्रयत्नांमध्ये 157 आणि 163 किलो वजन उचलले आहे. त्याच्या वजनाच्या दुप्पट वजन असून त्याने कजाकिस्तानच्या सेखान ताईसुयेवचा विक्रम मोडला. ताईसुयेवने 161 किलो वजन उचलले होते.

IPL 2019 : वर्ल्ड कपच्या अगोदर धोनीने वाढवलं टेन्शन

भारताच्या जेरेमीने एकूण 297 किलो वजन उचलले. तर पाकिस्तानच्या तल्हा तालिबने एकूण 304 किलो वजन उचलले. 16 वर्षीय जेरेमीचे ही वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट; स्फोटाचा भीषणता सांगणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading