S M L

Asian Games 2018: ‘गोल्डन ऐस’ रोहन बोपण्णा- दिवीज शरण जोडीची सुवर्ण कामगिरी

पहिल्या गेमपासून रोहन- दिवीजने सामन्यावरची पकड सैल पडू दिली नाही

Updated On: Aug 24, 2018 12:32 PM IST

Asian Games 2018:  ‘गोल्डन ऐस’ रोहन बोपण्णा- दिवीज शरण जोडीची सुवर्ण कामगिरी

इंडोनेशिया, २४ ऑगस्ट- भारताचे टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण या जोडीने भारताला पुरूष दुहेरी जोडीने सहावे सुवर्णपदक जिंकवून दिले. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात कजाकिस्तानच्या एलेक्सांद्र बुबलिक डेनिस येवसेयेव या जोडीला  ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये हरवले.अंतिम सामन्यात चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात असताना हा सामना पूर्णपणे भारताच्या बाजूनेच राहिला. पहिल्या गेमपासून रोहन- दिवीजने सामन्यावरची पकड सैल पडू दिली नाही. पहिला सेट केवळ २५ मिनिटांमध्ये संपला. दुसऱ्या सेटमध्ये कझाकिस्तानचे खेळाडू वरचढ ठरतील असे वाटत असताना भारतीय टेनिसपटूंनी सेट आणि सामना जिंकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. दुसरा सेटही केवळ २७ मिनिटांमध्ये संपला. रोहन- दिवीज यांनी भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवसाची धडाकेबाज सुरूवात झाली. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ०६:१७:१३ अशी वेळ नोंदवत भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं. दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह यांनी भारताला रोईंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. नेमबाजीत १० मी. एअर पिस्टल प्रकारात हिना सिद्धूला कांस्यपदक मिळाले.

याआधी सकाळी दुष्यंत चौधरीने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने ०७:१८:७६ अशी वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. यानंतर रोहित कुमार- भगवान सिंग या जोडीनेही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली डॉल्फिन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close