Asian Games 2018: बॅडमिंटनमध्ये पी.व्ही सिंधूला रौप्यपदक

Asian Games 2018: बॅडमिंटनमध्ये पी.व्ही सिंधूला रौप्यपदक

आशियाई खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची ऐतहासिक कामगिरी सिंधूने केली

  • Share this:

इंडोनेशिया, २८ ऑगस्ट- तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आशियाई खेळात बॅडमिंटनमध्ये पदक मिळालं. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला चीन तैपयीच्या नंबर १ खेळाडू ताई जू यंगने सरळ सेटमध्ये हरवले. ही संपूर्ण लढत एकतर्फी झाली. ताई जू यंग ही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. पी.व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र आशियाई खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची कामगिरी सिंधूने केल्यामुळे देशभरातून तिचे कौतुक केले जात आहे.

महिला एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीतसिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७,१५-२१,२१-१० असा पराभव केला. या विजयासोबतच बॅडमिंटनमध्ये आशियाई खेळात अंतिम सामन्यात पोहोचणारी पी.व्ही. सिंधी पहिली खेळाडू ठरली होती.

आशियाई खेळाच्या नवव्या दिवशी सायना नेहवालने कांस्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या एकेरी उपांत्य फेरीत सायना नेहवालला हार पत्करावी लागली. चीन तैपईच्या ताई जू यंगनेच सायनाचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. या पराभवामुळे १० व्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ताई जू यंगविरोधात सायनाचा हा १० वा पराभव आहे.

VIDEO : 20 फुटांवर आकाशपाळणा तुटला, दोन मुलं गंभीर जखमी

First published: August 28, 2018, 1:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading