S M L

Asian Games 2018 : 'सुवर्ण'झेप हुकली, महिला कबड्डीत भारताला रौप्यपदक

इराण आणि भारतामध्ये अत्यंत अतीतटीचा सामना रंगला.

Updated On: Aug 24, 2018 04:58 PM IST

Asian Games 2018 : 'सुवर्ण'झेप हुकली, महिला कबड्डीत भारताला रौप्यपदक

जकार्ता, 24 आॅगस्ट : पुरुष कबड्डी पाठोपाठ महिला कबड्डीतही फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इराणच्या महिला संघाने भारतील महिला संघाचा 27-24 या फरकाने पराभव केलाय. सुवर्णपदकाचे स्वप्न उराशी बाळगूण मैदानात उतरलेल्या महिला टीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

इराण आणि भारतामध्ये अत्यंत अतीतटीचा सामना रंगला. पण अखेरच्या क्षणात इराणच्या महिला खेळाडूंनी मुसंडी मारत 3 अंकाची आघाडी घेतली आणि विजय मिळवला. भारतीय महिला टीमने केले पर्यंत अपूर ठरले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

काल इराणच्या पुरुष संघानेच सातवेळी विजयी असलेल्या भारतीय संघाचा पराभव केला होता.

दरम्यान, आज भारताचे टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण या जोडीने भारताला पुरूष दुहेरी जोडीने सहावे सुवर्णपदक जिंकवून दिले. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात कजाकिस्तानच्या एलेक्सांद्र बुबलिक डेनिस येवसेयेव या जोडीला  ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये हरवले.अंतिम सामन्यात चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात असताना हा सामना पूर्णपणे भारताच्या बाजूनेच राहिला. पहिल्या गेमपासून रोहन- दिवीजने सामन्यावरची पकड सैल पडू दिली नाही. पहिला सेट केवळ २५ मिनिटांमध्ये संपला. दुसऱ्या सेटमध्ये कझाकिस्तानचे खेळाडू वरचढ ठरतील असे वाटत असताना भारतीय टेनिसपटूंनी सेट आणि सामना जिंकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. दुसरा सेटही केवळ २७ मिनिटांमध्ये संपला. रोहन- दिवीज यांनी भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले.

फोटो गॅलरी -या स्टार क्रिकेटर्सकडे आहेत महागडे कुत्रे

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 03:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close