Asian Games 2018: रोइंग टीमने भारताला दिले पाचवे सुवर्णपदक

Asian Games 2018: रोइंग टीमने भारताला दिले पाचवे सुवर्णपदक

दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह यांनी भारताला रोईंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं

  • Share this:

इंडोनेशिया, २४ ऑगस्ट- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवसाची धडाकेबाज सुरूवात झाली. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ०६:१७:१३ अशी वेळ नोंदवत भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं. दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह यांनी भारताला रोईंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. आशियाई स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं सुवर्णपदक आहे. याआधी सकाळी दुष्यंत चौधरीने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने ०७:१८:७६ अशी वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. यानंतर रोहित कुमार- भगवान सिंग या जोडीनेही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

याशिवाय दुपारी १.३० वाजता भारतीय महिला कबड्डी संघाचा अंतिम सामना इराणसोबत असणार आहे. सकाली ११ वाजता १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकेर आणि हिना सिद्धू पदकासाठी खेळतील.२५ मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताचा अनिश भनवालही पदकासाठी आज खेळणार आहे. याव्यतिरिक्त अथलेटिक्समध्ये दिपा कर्माकरही सुवर्णपदकाच्या शर्यतीत असेल. टेनिस दुहेरी प्रकारातही भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. रोहन बोपण्णा- दिवीज शरण ही जोडी आज सुवर्णपदकासाठी खेळणार आहे.

VIDEO : राज ठाकरेंनी रेखाटलं अटलजींचं व्यंगचित्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 09:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading