Asian Games 2018: सांघिक महिला आणि पुरूष तिरंदाजीत भारताला रौप्यपदक

Asian Games 2018: सांघिक महिला आणि पुरूष तिरंदाजीत भारताला रौप्यपदक

१० दिवसाच्या सुरूवातीला भारताच्या खात्यात दोन रौप्य पदकं जमा झाली

  • Share this:

सांघिक महिला तिरंदाजीत भारताला रौप्यपदक मिळाले असून, अंतिम फेरीत कोरियाने २३१- २२८ अशी भारतावर मात करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. संपूर्ण सामना पहिल्या गेमपासून अटीतटीचा सामना होता. पण मौक्याच्या क्षणी भारतीय खेळाडूंना १० गुणांची कमाई करता आली नाही. याच फायदा कोरियाचा खेळाडूंना झाला. सांघिक पुरूष संघालाही रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. पुरूषांचा सामना टाय-ब्रेकपर्यंत गेला होता. मात्र मौक्याच्या क्षणी कोरियाच्या खेळाडूंनी खेळ उंचावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सांघिक तिरंदाजीत भारताचे दोन्ही सामने हे कोरियाविरुद्ध होते. १० दिवसाच्या सुरूवातीला भारताच्या खात्यात दोन रौप्य पदकं जमा झाली.

नवव्या दिवशी भारताच्या नावावर अनेक पदकं जमा झाली. यात अथलेटिक्सचं मोठं योगदान आहे. भालाफेकीत नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकत भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. भारताचं हे ८ वं सुर्वणपदक आहे. अतिशय दमदार खेळी करत नीरजनं आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि त्यात त्याला यशही मिळालं. भारतानं आत्तापर्यंत ८ सुवर्णपदकासह एकून ३९ पदकं आपल्या खात्यात जमा केले आहेत. भारताने आत्तापर्यंत ८ सुवर्ण, १२ रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकली आहेत.

बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

First published: August 28, 2018, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading