News18 Lokmat

Asian Games 2018: डबल धमाका, जॉनसन आणि महिला टीमने पटकावले दोन सुवर्णपदक

तर भारतीय महिला धावपटू चित्रा उन्नीकृष्णननने 1500 मिटर स्पर्धेत कास्यपदक पटकावले आहे

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2018 07:29 PM IST

Asian Games 2018: डबल धमाका, जॉनसन आणि महिला टीमने पटकावले दोन सुवर्णपदक

जकार्ता, 30 आॅगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत धावपटू जिनसन जाॅनसनने पुरुष 1500 मीटर स्पर्धेत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. जिनसनने फक्त तीन मिनिट 44.72 सेकंदात जाॅनसनने सुवर्णपदकाला गवसणी घातलीये. तर दुसरीकडे 4X 400 मिटर स्पर्धेत पूवाम्‍मा, सरिताबेन आणि विस्‍मायानेही भारतासाठी सुवर्णपदक मिळवून दिले.

इराणच्या अमीर मुरादीने तीन मिनिट 45.621 सेकंदात रौप्यपदक तर बहरीनच्या मोहम्मद तौलाइने तीन मिनिट

45.88 सेकंदावर राहुन कास्यपदक पटकावले आहे.

तर भारतीय महिला धावपटू चित्रा उन्नीकृष्णननने 1500 मिटर स्पर्धेत कास्यपदक पटकावले आहे. चित्राने चार मिनिट 12.56 सेंकदात हे अंतर पार केले पण ती तिसऱ्या स्थानावर राहिली.

याआधी 11 व्या दिवशी आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदर सिंहने ट्रिपल जंप प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. अरविंद सिंहने 16.77 मिटर अंतर पार करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर भारतासाठी स्वपना बर्मनने इतिहास रचलाय. स्वपना बर्मनने हेप्टाथलन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

Loading...

टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी एकूण 14 सुवर्णपदकांची कमाई केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...