S M L

विनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2018 06:13 PM IST

विनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक

20 ऑगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत नुकत्याच पार पडलेल्या कुस्तीच्या सामन्यात विनेश फोगाटने बाजी मारली आहे. पहिल्या फेरीत, विनेशने 4-0 अशी आघाडी घेत एका झटक्यात जपानच्या खेळाडूला धूळ चारत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिच्या या दमदार खेळीमुळे भारताच्या खात्यात दुसऱ्या सुवर्णरपदकाची नोंद झाली आहे. 50 किलोमध्ये विनेशने सेमीफायनलमध्ये उज्‍बेकिस्‍तानच्या खेळाडूला काही मिनिटांत 10-0 ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

तर काल झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. बजरंगने जपानच्या तकातानीला 10-8 ने धोबीपछाड देत सुवर्णपदक पटकावले आहे.

बजरंग पुनिया आणि आणि जपानच्या तकातानीमध्ये रोमहर्षक सामना रंगला. पण बजरंग पुनियाने जबरदस्ती खेळी केली. तकातानीचा प्रत्येक डाव त्याने मोडीत काढला. बजरंगने 8-6 अशी आघाडी कायम ठेवली होती. बजरंगने तकातानीला आस्मान दाखवत दोन अंकाची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या विजयामुळे आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.


Loading...

याआधी भारतीय महिला टीमने 'विजयी' सलामी दिली. महिला टीमने जपानला 43-12 अशा फरकाने पराभूत केलं. त्यानंतर नेमबाजीत भारताला पहिले पदक मिळाले. 10 मीटर एअर रायफल मिक्स्डमध्ये अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने कास्यपदकाची कमाई केली.  अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने 429.9 अंक मिळवून कास्यपदक पटकावले.

तर दुसरीकडे कुस्तीमध्ये भारताला मोठा झटका बसलाय. दोन वेळा आॅलम्पिक मेडलिस्ट सुशील कुमार पहिल्यात राऊंडमध्ये बाहेर फेकला गेला. सुशील कुमारचा बहरिनच्या एडम बातिरोवने 5-3 ने पराभव केला. बजरंग पुनियाने 65 किलोच्या वजनी गटात उज्बेकिस्तानच्या कुस्तीपटूचा 13-3 ने पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आणि जपानच्या तकातानीचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले. 57 किलो वर्गात संदीप तोमरनेही विजय मिळवून क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे.

अनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2018 06:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close