Asian Games 2018: सात वेळा विजयी राहिलेल्या भारतीय टीमचा कबड्डीत पराभव

Asian Games 2018: सात वेळा विजयी राहिलेल्या भारतीय टीमचा कबड्डीत पराभव

  • Share this:

जकार्ता, 23 आॅगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत सेफीफायनलमध्ये भारताचा कबड्डीत पराभव झालाय. तब्बल सात वेळा विजयी असलेल्या भारतीय टीमला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागलाय. पुरूष कबड्डीत इराणने भारताचा 27-18 ने पराभव केलाय. त्यामुळे भारताला कास्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, १८ व्या एशियाई खेळाच्या पाचव्या दिवशी टेनिसपटू अंकिता रैनाने भारतला कांस्य पदक जिंकून दिल्यानंतर १५ वर्षीय नेमबाज शार्दुल विहानने डबल ट्रॅप स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यात एकूण चार रौप्य पदक जमा झाले आहेत. कोरियाच्या ह्यूनवुडला या प्रकरात सुवर्णपदक मिळाले. तर कतारच्या हमाद अलीला कांस्य पदक मिळाले. आतापर्यंत भारताने १७ पदकांची कमाई केली आहे.

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 06:07 PM IST

ताज्या बातम्या