मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asian Champions Trophy: सेमी फायनलमध्ये जपानचा भारताला धक्का, आता पाकिस्तानशी लढत!

Asian Champions Trophy: सेमी फायनलमध्ये जपानचा भारताला धक्का, आता पाकिस्तानशी लढत!

भारतीय हॉकी टीम आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधून (Asian Champions Trophy) बाहेर झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जपानने भारताचा 5-3 ने पराभव केला.

  • Published by:  Shreyas

ढाका, 21 डिसेंबर : भारतीय हॉकी टीम आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधून (Asian Champions Trophy) बाहेर झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जपानने भारताचा 5-3 ने पराभव केला, त्याआधी लीग स्टेजमध्ये भारताने जपानला 6-0 ने धूळ चारली होती, पण सेमी फायनलमध्ये मात्र भारताला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. भारतीय टीम आता 22 डिसेंबरला तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळेल, तर फायनलमध्ये जपानचा मुकाबला दक्षिण कोरियाविरुद्ध होईल.

जपानने सुरुवातीपासूनच मॅचवर आपली पकड मजबूत केली, पहिल्या क्वार्टरमध्ये जपानने 2-0 ने आघाडी मिळवली. हाफ टाईमपर्यंत स्कोअर 3-1 ने जपानच्या बाजूने होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी 2 गोल केले, पण अखेर जपानने हा सामना 5-3 ने जिंकला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियाने पाकिस्तानचा 6-5 ने पराभव केला.

दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यात आता 22 डिसेंबरला फायनल होणार आहे, त्यामुळे यंदा नवा चॅम्पियन मिळणार आहे. स्पर्धेचा हा सहावा मोसम आहे. भारत आणि पाकिस्तानशिवाय अन्य कोणत्याही टीमला ट्रॉफी मिळालेली नाही. भारत आणि पाकिस्तान प्रत्येकी तीन-तीन वेळा स्पर्धा जिंकल्या. 2011 आणि 2016 साली भारताचा तर 2012 आणि 2013 साली पाकिस्तानला ट्रॉफी जिंकण्यात यश आलं होतं. 2018 साली झालेल्या मोसमात भारत आणि पाकिस्तानला संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं होतं.

यंदाच्या मोसमात लीग राऊंडमध्ये 3 विजयांसह 10 पॉईंट्स मिळवत भारत पहिल्य क्रमांकावर होता, तर जपानने 4 पैकी फक्त एकच मॅच जिंकली होती. नॉक आऊट सामन्यामध्ये मात्र त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत भारताला धक्का दिला.

First published: