मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asian Champions Trophy, IND vs PAK: क्रिकेटच्या पराभवाचा बदला हॉकीत, भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने विजय

Asian Champions Trophy, IND vs PAK: क्रिकेटच्या पराभवाचा बदला हॉकीत, भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने विजय

खेळ कोणताही असो भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan) टीम जेव्हा समोरासमोर असतात तेव्हा रोमांच भरपूर असतो. असाच रोमांचक सामना शुक्रवारी ढाक्यामध्ये पाहायला मिळाला. भारतीय हॉकी टीमने धमाकेदार कामगिरी करत एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Asian Champions Trophy) लीग स्टेज सामन्यात पाकिस्तानचा 3-1 ने पराभव केला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 डिसेंबर : खेळ कोणताही असो भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan) टीम जेव्हा समोरासमोर असतात तेव्हा रोमांच भरपूर असतो. असाच रोमांचक सामना शुक्रवारी ढाक्यामध्ये पाहायला मिळाला. भारतीय हॉकी टीमने धमाकेदार कामगिरी करत एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Asian Champions Trophy) लीग स्टेज सामन्यात पाकिस्तानचा 3-1 ने पराभव केला. ढाक्यामध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय टीमने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला, ज्याचा फायदा टीमला झाला.

हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) या सामन्यात 2 गोल आणि आकाशदीप सिंगने (Aakashdeep Singh) एक गोल केला. पाकिस्तानकडून एकमेव गोल जुनैद मंजूरने तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरच्या मिनिटाला केला. हरमनने पेनल्टी कॉर्नरवरून पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताला आघाडी मिळवून दिली. त्याने 9 व्या मिनिटाला गोल केला आणि स्कोअर 1-0 केला. मॅचच्या दुसऱ्याच मिनिटाला अर्शदीप सिंगला चुकीच्या टॅकलमुळे दोन मिनिट मैदानाबाहेर जावं लागलं.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला 2 मिनिटं 10 खेळाडूंसोबतच खेळावं लागलं. पाकिस्तानने याचा फायदा उचलण्यासाठी काऊंटर अटॅक केला, पण भारतीय डिफेंडरनी पाकिस्तानी आक्रमणाला नाकाम केलं. पहिल्या हाफ पर्यंत भारत 1-0 ने आघाडीवर होता.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने मॅचवर आपलं नियंत्रण कायम ठेवलं. 41व्या मिनिटाला पाकिस्तानच्या हमामुद्दीनला अंपायरने ग्रीन कार्ड दाखवलं, ज्यामुळे त्याला 2 मिनिटं मैदानाबाहेर जावं लागलं. भारताने याचा फायदा घेतला आणि आकाशदीप सिंग याने 42व्या मिनिटाला रिव्हर्स फ्लिक मारत भारताची आघाडी 2-0 वर नेली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाकिस्तानने गोल करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. जुनैद मंजूरने 45 व्या मिनिटाला गोल करून सामना 2-1 वर आणला.

चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून बरोबरी करण्याची संधी होती, पण भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगच्या रेफरलमुळ दोन्ही अंपायरना निर्णय बदलावा लागला. व्हिडिओमध्ये बॉल पाकिस्तानी खेळाडूच्या पायाला लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. मैदानातल्या अंपायरना मात्र बॉल भारतीय खेळाडूच्या पायाला लागल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर दिला होता.

यानंतर भारताने पूर्णपणे आक्रमक खेळ केला आणि 53 व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरून तिसरा गोल केला. यानंतर पाकिस्तानला पुनरागमन करणं अशक्य झालं.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमला ऐतिहासिक मेडल मिळालं, यानंतर भारताची ही पहिलीच स्पर्धा आहे. एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाविरुद्धचा सामना ड्रॉ केला होता. या सामन्यात मिळालेली 2 गोलची बढत भारताने गमावली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 9-0 ने दारूण पराभव केला होता. भारताकडून दिलप्रीत सिंगने हॅट्रिक केली, तर जरमनप्रीत सिंगने 2 गोल केले होते.

First published: