'माझ्या सुवर्णपदकासाठी वडिलांनी खाल्लं जनावरांचं खाद्य'

'माझ्या सुवर्णपदकासाठी वडिलांनी खाल्लं जनावरांचं खाद्य'

आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्ण मिळवून देणाऱ्या गोमतीला सरावासाठी प्रशिक्षकांनी फोनवरून मार्गदर्शन केलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : भारताला आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 800 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या गोमती मरिमुथुची यशोगाथा संघर्षमय अशी आहे. तामिळनाडुच्या या सुवर्णकन्येनं चेन्नईत पत्रकार परिषदेत आपल्या सुवर्ण पदकापर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल सांगितलं. यावेळी तिने आपल्या या यशात वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचं सांगितलं.

गोमती म्हणाली की, मला चांगल खायला मिळावं यासाठी वडिलांनी जनावरांसाठी ठेवलेलं खाल्लं. हे सांगताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. काही वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले. सध्या गोमती बेंगळुरूत आयकर विभागात सहाय्यक विक्रिकर निरीक्षक म्हणून काम करत आहे.

पाहा VIDEO : विराटने वापरले अपशब्द, अश्विनने असा काढला राग

वडिलांबद्दल बोलताना गोमती म्हणाली की, मी चॅम्पियनशिपची तयारी करत होते तेव्हा वडिलांना चालायला त्रास व्हायचा. माझ्या गावात बसची सोय नाही. त्यावेळी पहाटे 4 वाजता मला उठवायचे आणि स्वत: आईला घरकामात मदत करायचे असं भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या गोमतीने सांगितले.

स्पर्धेसाठी भारत सरकारकडून म्हणावी तशी मदत झाली नसल्याचंही गोमतीने सांगितलं. पदक जिंकण्याचा विश्वास होता. एकटीने तयारी केली त्यासाठी पदरमोड करून खर्च केला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी फोनवरून तिला सरावाची माहिती दिली. त्याच्या मदतीनेच मी हे यश संपादन केलं असं गोमतीने सांगितलं.

वाचा : धोनीसोबत खेळले होते वडील, आता मुलगा गाजवतोय IPL

तामिळनाडु सरकारने मदत केल्यास आणखी कष्ट करण्याची आणि ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करेन असंही गोमती म्हणाली. प्रत्येकवेळी हक्कासाठी संघर्ष करावा लागला. सरकारने जर वेळीच मदत केली असती तर बरं झालं असतं. आता पदक जिंकल्यावर तामिळनाडु आणि भारत सरकारने मदतीची घोषणा केली असल्याचं गोमतीनं सांगितलं.

VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

First published: April 28, 2019, 8:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading