मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia XI संघात पंत, केएल राहुलसह भारताचे 5 खेळाडू, World XI विरुद्ध खेळणार दोन टी20

Asia XI संघात पंत, केएल राहुलसह भारताचे 5 खेळाडू, World XI विरुद्ध खेळणार दोन टी20

आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात 19 आणि 21 मार्चला दोन टी20 सामने होणार आहेत. यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात 19 आणि 21 मार्चला दोन टी20 सामने होणार आहेत. यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात 19 आणि 21 मार्चला दोन टी20 सामने होणार आहेत. यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

  • Published by:  Suraj Yadav

ढाका, 25 फेब्रुवारी : बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यातील दोन टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर झाले आहेत. यामध्ये आशिया इलेव्हन संघात भारताच्या 5 खेळाडूंना जागा मिळाली आहे. यात यष्टीरक्षक ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. यांच्यासोबत विराट कोहलीचेही संघात नाव आहे पण तो खेळण्यावर शिक्कामोर्तब नाही. केएल राहुलसुद्धा आशिया इलेव्हनसाठी एका टी20 सामन्यात उपलब्ध होऊ शकतो. तर क्रिकेटच्या मैदानापासून बराच काळ दूर असलेल्या धोनीला संघात जागा मिळू शकली नाही.

आशिया इलेव्हनमध्ये 4 बांगलादेशच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये लिट्टन दास, तमीम इकबाल, मुश्फिकुर रहीम, मुस्थफिजुर रहमान हे चार खेळाडू आहेत. तर थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगा हे दोन लंकेचे खेळाडू आहेत. नेपाळचा संदीप लामिछानेसुद्धा संघात आहे. अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांची संघात वर्णी लागली आहे.

वर्ल्ड इलेव्हनच्या संघात अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो आणि आदिल राशीद या इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. तर विंडीजचे चार खेळाडूही आहेत. ख्रिस गेल, निकोलस पूरन, केऱॉन पोलार्ड, शेल्ड़न कॉट्रेल हे वर्ल्ड इलेव्हनमध्ये आहेत. तर या संघाचे नेतृत्व फाफ डुप्लेसीकडे देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी, रॉस टेलर, मिशेल मॅक्लनघन आणि अँड्रयू टाय वर्ल्ड इलेव्हन संघात आहेत.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात दोन टी20 सामन्यांचे आयोजन केले आहे. हे दोन्ही सामने 19 आणि 21 मार्चला होणार आहेत. बांगलादेशचे संस्थापक बंगबंधु शेख मुजीब उर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या सामन्यांचे आयोजन करण्यात आलं आहे.

आशिया इलेव्हन संघ - केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, लिट्टन दास, तमीम इकबाल, मुश्फिकुर रहीम, थिसारा परेरा, राशिद खान, मुस्तफिजुर रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा, मुजीब उर रहमान.

वर्ल्ड इलेव्हन - अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो, आदिल राशिद, ख्रिस गेल, निकोलस पूरन, केरॉन पोलार्ड, शेल्डन कॉट्रेल, फाफ डुप्लेसी, लुंगी एनगिडी, रॉस टेलर, मिशेल मॅक्लनघन, अँड्र्यू टाय,

वाचा : ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’वर येणार Biopic! हा अभिनेता आहे गांगुलीची पहिली पसंत

First published:

Tags: Cricket, Virat kohli