मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia Cup 2022: रोहितचा लाडका घेणार के एल राहुलची जागा?

Asia Cup 2022: रोहितचा लाडका घेणार के एल राहुलची जागा?

आशिया कपसाठी सामने सुरू आहेत. टीम इंडियाने दोन विजय मिळवले आहेत. पाकिस्तान आणि हाँगकाँगला धूळ चारली आहे. पुढची स्पर्धा अधिक चुरशीची आणि आव्हानात्मक असू शकते.

आशिया कपसाठी सामने सुरू आहेत. टीम इंडियाने दोन विजय मिळवले आहेत. पाकिस्तान आणि हाँगकाँगला धूळ चारली आहे. पुढची स्पर्धा अधिक चुरशीची आणि आव्हानात्मक असू शकते.

आशिया कपसाठी सामने सुरू आहेत. टीम इंडियाने दोन विजय मिळवले आहेत. पाकिस्तान आणि हाँगकाँगला धूळ चारली आहे. पुढची स्पर्धा अधिक चुरशीची आणि आव्हानात्मक असू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 2 सप्टेंबर : आशिया कपसाठी सामने सुरू आहेत. टीम इंडियाने दोन विजय मिळवले आहेत. पाकिस्तान आणि हाँगकाँगला धूळ चारली आहे. पुढची स्पर्धा अधिक चुरशीची आणि आव्हानात्मक असू शकते. त्यामुळे रोहितला टीम अधिक मजबूत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. त्यातच के एल राहुल दुखापतीमधून नुकताच फिट होऊन मैदानात परतला आहे. त्यामुळे त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी थोडा अवधी लागू शकतो.

के एल राहुलची ही कमतरता टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज भरून काढेल असा विश्वास टीम मॅनेजमेंट आणि रोहित शर्माला आहे. हा खेळाडू रोहितचा लाडका देखील आहे. त्यामुळे त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. तो के एल राहुलची जागा घेण्याची शक्यता आहे.

सूर्यकुमार यादव आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. कमी बॉलमध्ये जास्त धावा काढण्यात तो माहीर आहे. तो कोणत्याही नंबरवर तेवढ्या उत्तम पद्धतीने खेळू शकतो. टी 20 मध्ये कोणत्याही क्रमांकावर त्याला पाठवलं तरी त्याचं कौशल्य आणि तुफान बॅटिंग दोन्ही चाहत्यांना नेहमी पाहायला मिळते.

हेही वाचा-Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर बनला कॅप्टन, पाहा कुठे करणार फोर आणि सिक्सची बरसात?

सूर्यकुमारने बुधवारी झालेल्या सामन्यात 26 बॉलमध्ये 68 धावा केल्या. भारताला 40 धावांनी विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हाँगकाँग विरुद्ध तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मी कोणत्याही नंबरवर खेळू शकतो असा विश्वास सूर्यकुमारने पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता.

मला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवा असं मी कर्णधार आणि कोच यांना सांगितलं आहे. मला फक्त खेळायचं आहे मला फलंदाजीसाठी मैदानात उतरवा असं सूर्यकुमारचं म्हणणं आहे. तर दुखापतीमुळे के एल राहुलला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी वेळ लागू शकतो. टी 20 वर्ल्ड कपअगदी जवळ आला आहे.

हेही वाचा-Irfan Pathan: इरफान पठाणची नवी इनिंग, तामिळ चित्रपटात झळकला स्विंगचा बादशाह

आता पुढच्या सामन्यात के एल राहुलच्या जागी सूर्यकुमार यादव ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. तशी चर्चा देखील होत आहे. आपल्या फलंजीने त्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. सूर्यकुमार ओपनिंगला पुढच्या सामन्यात उतरणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.

दुसरीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादवची एकंदर कामगिरी पाहता तो के एल राहुलची जागा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. टी 20 वर्ल्ड कपपर्यंत निवड समितीकडे वेळ आहे. ते प्रत्येकाला आजमावत आहेत असं जरी रोहित म्हणाला असला तरी के एल राहुल जर तोपर्यंत फॉर्ममध्ये येण्यात अपयशी ठरला तर सूर्यकुमार त्याच्या जागी खेळू शकतो अशी चर्चा आहे.

First published:

Tags: Asia cup, India vs Pakistan, Rohit sharma, Suryakumar yadav, Virat kohli