Home /News /sport /

Asia Cup Hockey: भारताने इंडोनेशियाला 16-0 ने धुतलं, नॉकआऊटमध्ये प्रवेश निश्चित, पाकिस्तानला धक्का

Asia Cup Hockey: भारताने इंडोनेशियाला 16-0 ने धुतलं, नॉकआऊटमध्ये प्रवेश निश्चित, पाकिस्तानला धक्का

गतिविजेत्या भारताने आशिया कप हॉकी (Asia Cup Hockey) स्पर्धेत इंडोनेशियाचा (India vs Indonesia) 16-0 ने धुव्वा उडवला आहे. भारताच्या या विजयासोबतच पाकिस्तानला (Pakistan) धक्का बसला आहे.

    मुंबई, 26 मे : गतिविजेत्या भारताने आशिया कप हॉकी (Asia Cup Hockey) स्पर्धेत इंडोनेशियाचा (India vs Indonesia) 16-0 ने धुव्वा उडवला आहे. या विजयासोबतच भारताचं नॉकआऊट स्टेजमधलं स्थान निश्चित झालं आहे. भारताच्या या विजयासोबतच पाकिस्तानला (Pakistan) धक्का बसला आहे. पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर झाली आहे. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताने 6 गोल केले, यानंतर गोलचा पाऊसच सुरू झाला. एका मागोमाग एक भारताने 10 आणखी गोल केले. भारताकडून दिस्पान तिर्कीने 5 आणि सुदेवला 3 गोल करण्यात यश आलं. आता सुपर-4 मध्ये भारताचा मुकाबला 28 मे रोजी जपानविरुद्ध होणार आहे. भारताला स्पर्धेत पुढे जाण्यासाठी इंडोनेशियाविरुद्ध कमीत कमी 15 गोलच्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं, पण भारतीय हॉकी टीमने एक गोल जास्त करत पाकिस्तानला नॉक आऊटमध्ये पोहोचण्यापासून रोखलं. याआधी भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना 1-1 ने बरोबरीत सुटला होता. तर जपानने भारताचा पराभव केला होता, यानंतर पाकिस्तानही जपानविरुद्ध पराभूत झालं होतं, त्यामुळे भारताला सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी इंडोनेशियाचा 15 गोलच्या फरकाने पराभव करणं गरजेचं होतं. तरच भारत पाकिस्तानच्या पुढे जाऊ शकणार होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या