Elec-widget

धोनी कुलदीपला का म्हणाला, ‘बॉलिंग करतोस की बॉलर बदलू’

धोनी कुलदीपला का म्हणाला, ‘बॉलिंग करतोस की बॉलर बदलू’

याआधीही धोनी जडेजा, रैना, उथप्पा आणि कोहली यांना मैदानात ओरडला आहे

  • Share this:

२७ सप्टेंबर २०१८- भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान झालेल्या एशिया कपच्या सुपर- ४ चा सामना बरोबरीत सुटला. अफगाणिस्तानच्या २५३ धावांच्या पाठलाग करताना भारताच्या नाकीनऊ आले. हा सामना दोन्ही संघासाठी फार खास होता. भारताकडून कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीने स्वीकारली होती. कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा सामना होता.

पूर्ण सामन्यात कर्णधार धोनीचा जुना चेहराच दिसत होता. एशिया कपमध्ये अंतिम सामन्यात स्थान निश्चित केल्यामुळे कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्याचे ठरवले. सामन्यात अशा अनेक संधी आल्या जिकडे जुना धोनी चाहत्यांना दिसला.

सामन्यात कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. धोनी ६९६ दिवसांनंतर कर्णधारपदाची भूमिका बजावत होता. त्यात अफगाणिस्तानकडून उत्तम खेळाची कदाचित त्याला अपेक्षा नसेल. अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद शहजाद फॉर्ममध्ये होता. तेव्हा कुलदीपने कर्णधार धोनीला क्षेत्ररक्षणात बदल करण्यास सांगितले.

कर्णधार असताना धोनी त्याच्या सहकाऱ्यांसोबत वेगळ्य पद्धतीने वागतो. धोनीने वेगळ्या पद्धतीने कुलदीपला क्षेत्ररक्षणात बदल करण्यास मनाई केली. धोनी कुलदिपला म्हणाला की, ‘गोलंदाजी करतोस की गोलंदाजच बदलू.’

ही गोष्ट स्टंप माईकमधून ऐकू आली आणि सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू झाली. यानंतर कुलदीपने काहीही न बोलता गोलंदाजी केली. याआधीही धोनी जडेजा, रैना, उथप्पा आणि कोहली यांना मैदानात ओरडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...