मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Asia Cup : सारं जग विरूद्ध होते तेव्हा फक्त धोनीनं दिली साथ, फॉर्मात येताच विराटचा खळबळजनक खुलासा

Asia Cup : सारं जग विरूद्ध होते तेव्हा फक्त धोनीनं दिली साथ, फॉर्मात येताच विराटचा खळबळजनक खुलासा

Asia Cup : आशिया कप स्पर्धेत फॉर्मात परताच टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

Asia Cup : आशिया कप स्पर्धेत फॉर्मात परताच टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

Asia Cup : आशिया कप स्पर्धेत फॉर्मात परताच टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

दुबई, 5 सप्टेंबर : आशिया कप (Asia Cup) टी20 स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध रविवारी झालेल्या लढतीमध्ये टीम इंडियाचा (India vs Pakistan) 5 विकेट्सनं पराभव झाला.  भारतीय टीमचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे. माजी कॅप्टन विराट कोहलीला गवसलेला फॉर्म ही या पराभवातही भारतीय खेळाडूंसाठी दिलासादायक बाब होती. विराटनं पाकिस्तान विरूद्ध 44 बॉलमध्ये 60 रनची खेळी केली. त्याचं या स्पर्धेतील सलग दुसरं अर्धशतक आहे. यापूर्वी त्यानं हाँगकाँग विरूद्ध 59 रनची खेळी केली होती. आशियाकपमध्ये फॉर्मात परताच विराट कोहलीनं एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

विराटचा गौप्यस्फोट

सलग दोन अर्धशतक झळकावत आपण फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत विराटनं दिले आहे. पाकिस्तान विरूद्धच्या मॅचनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फॉर्मात परतलेल्या विराटनं एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. 'मी टेस्ट कॅप्टन्सी सोडली तेव्हा मी ज्याच्याबरोबर खेळलो आहे अशा फक्त एका खेळाडूचा मला मेसेज आला होता. तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. इतर लोकांकडेही माझा नंबर होता. बरेच लोक मला खेळाबद्दल सल्ला देतात. धोनीने मला मेसेज केला यातूनच आमची बाँडिंग दिसून येतं. इतर लोक काय म्हणतात, याकडे मी जास्त लक्ष देत नाही. सध्या टीममध्ये खूप चांगलं वातावरण आहे.’

विराट एवढ्यावरच थांबला नाही तर, 'तुमच्या मनात एखाद्याविषयी आदर असेल, तुमचं कनेक्शन चांगलं असेल आणि ते खरं असेल तर ते दिसून येतं. त्या नात्यात सुरक्षितता आहे, हे देखील समजतं. मला कोणाला काही सुचवायचं असेल तर मी वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संपर्क साधेन आणि त्याबद्दल सार्वजनिकपणे जाऊन बोलण्यापेक्षा मला काय वाटतं आणि त्याने काय करण्याची आवश्यकता आहे ते त्यांना वैयक्तिकरित्या सांगेन.' असं कुणाचंही नाव न घेता त्यानं यावेळी सुनावलं.

Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाच्या पराभवाचं कोहलीनं सांगितलं कारण

मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर स्पर्धेची सेमी फायनल गाठण्यात भारतीय टीमला अपयश आले. या वर्ल्ड कपनंतर  टी-20 कॅप्टन्सी (T20 captaincy) सोडली. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) त्याची वन-डे कॅप्टन्सी (ODI captaincy) काढून घेतली. तर जानेवारी 2022मध्ये दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर विराटने टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा (Test captaincy) राजीनामा दिला होता.

कोहली फॉर्ममध्ये येणं ही टीमसाठी दिलासादायक बाब आहे. मोठ्या ब्रेकनंतर तो परतला आहे. आशिया कपनंतर भारताला देशातच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3-3 टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपदेखील होणार आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs Pakistan, MS Dhoni, Virat kohli