मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

गल्ली क्रिकेटसारखे मैदानात भांडले आता ICC कडून या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई

गल्ली क्रिकेटसारखे मैदानात भांडले आता ICC कडून या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई

आशिया कपमध्ये या दोन खेळाडूंवर ICC ने मोठी कारवाई केली आहे.

आशिया कपमध्ये या दोन खेळाडूंवर ICC ने मोठी कारवाई केली आहे.

आशिया कपमध्ये या दोन खेळाडूंवर ICC ने मोठी कारवाई केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : खेळ म्हटलं की वाद होणार पण हे वाद कधीकधी मर्यादा सोडतात आणि त्यामुळे प्रचंड तणाव मैदानात तयार होतो. गल्ली क्रिकेटसारखं मैदानात भांडण करणं 2 खेळाडूंना चांगलंच महागात पडलं आहे. आशिया कपमध्ये या दोन खेळाडूंवर ICC ने मोठी कारवाई केली आहे.

आयसीसीने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद यांच्यावर मोठी कारवाई केली. आशिया कपमध्ये सुपर फोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात हे दोघं भिडले. रागाच्या भरात पाकिस्तानच्या खेळाडूनं मारण्यासाठी बॅट दाखवली.

आयसीसीने या दोन्ही खेळाडूंवर लेव्हल 1 च्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली. ICC ने आसिफ अली आणि फरीद अहमद यांना त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे.

आईसीसी ने आसिफ अली और फरीद अहमद पर ठोका भारी जुर्माना. (Screengrab)

त्यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आसिफवर आशिया कपमध्ये ICC ने खेळण्याची बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

त्याने आचारसंहितेच्या कलम 2.6 चे उल्लंघन केले आहे. दोन्ही खेळाडूंचं वर्तन गैर असल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आणि वॉर्निंगही देण्यात आली आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या 19 व्या ओव्हरमध्ये दोघांमध्ये वादावदी झाली. त्यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूनं त्याला रागाच्या भरात बॅट दाखवली. या सगळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. तर पाकिस्तानच्या खेळाडूवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. अशा प्रकारचं गैरवर्तन केल्यानं ICC ने कारवाई केली आहे.

First published:

Tags: Asia cup, Icc