• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • क्रिकेट चाहत्यांची निराशा, टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द

क्रिकेट चाहत्यांची निराशा, टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्यामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली, यानंतर आता क्रिकेट रसिकांसाठी आणि एक निराशाजनक बातमी आहे. जून महिन्यात श्रीलंकेमध्ये होणारा आशिया कप (Asia Cup) रद्द करण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 मे : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्यामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली, यानंतर आता क्रिकेट रसिकांसाठी आणि एक निराशाजनक बातमी आहे. जून महिन्यात श्रीलंकेमध्ये होणारा आशिया कप (Asia Cup) रद्द करण्यात आला आहे. आयोजकांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. मागच्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती, पण तेव्हाही कोरोनामुळेच स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे एक्झिक्युटिव्ह एश्ले डिसिल्व्हा म्हणाले, 'कोरोना व्हायरसमुळे आशिया कप आयोजित करण्यासारखी परिस्थिती सध्या नाही. कदाचीत पुढची दोन वर्ष ही स्पर्धा आयोजित करता येणार नाही, कारण टीमचे कार्यक्रम आधीच ठरले आहेत, त्यामुळे 2023 वर्ल्ड कपनंतरच आशिया कपचं आयोजन होऊ शकतं.' लवकरच आशियाई क्रिकेट संघ याची घोषणा करेल, असंही डिसिल्व्हा यांनी सांगितलं. दक्षिण आशियामध्ये सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अनेक देशांनी विमानसेवाही बंद केल्या आहेत, त्यामुळे आशिया कप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आशिया कप रद्द करण्याचं प्रमुख कारण टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रकही आहे. भारतीय टीम जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्टची सीरिज होणार आहे. आशिया कपमध्ये जर भारतच सहभागी झाला नाही, तर आयोजकांचं मोठं नुकसान होईल. भारताने जिंकले सर्वाधिक आशिया कप भारताचं आशिया कपमधलं रेकॉर्ड सर्वोत्तम आहे. सर्वाधिक 7 वेळा टीम इंडियाने आशिया कप जिंकला. शेवटचा आशिया कप 2018 साली खेळवला गेला, तेव्हाही भारतानेच विजय मिळवला होता. टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशला हरवलं होतं. भारत 1984, 1988, 190-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये आशिया कप जिंकला आहे.
  Published by:Shreyas
  First published: