मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'...म्हणून अश्विनला क्रिकेटपासून लांब ठेवण्यात आलं,' पाकिस्तानी बॉलरचा धक्कादायक आरोप

'...म्हणून अश्विनला क्रिकेटपासून लांब ठेवण्यात आलं,' पाकिस्तानी बॉलरचा धक्कादायक आरोप

पाकिस्तानचे क्रिकेटपटू कायमच भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येतात. यावेळी पाकिस्तानचा माजी स्पिनर सईद अजमल (Saeed Ajmal) याने भारताचा दिग्गज स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई, 14 जून : पाकिस्तानचे क्रिकेटपटू कायमच भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येतात. यावेळी पाकिस्तानचा माजी स्पिनर सईद अजमल (Saeed Ajmal) याने भारताचा दिग्गज स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काहीच दिवसांपूर्वी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी अश्विन हा ऑल टाईम ग्रेट खेळाडू नसल्याचं मत मांडलं होतं, त्यानंतर आता सईद अजमल याने अश्विनबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आयसीसीने (ICC) बंदी घालू नये, म्हणून अश्विनला जाणून बुजून काही काळ क्रिकेटपासून लांब ठेवण्यात आलं, असा दावा अजमलने केला आहे. बेकायदेशीर बॉलिंग ऍक्शनमुळे आयसीसीने सईद अजमलवर दोन वेळा बंदी घातली होती.

'तुम्ही हे नियम कोणालाही न विचारता बदललेत. 8 वर्ष मी क्रिकेट खेळत होतो, हे नियम फक्त मलाच होते. त्याकाळात अश्विन 6 महिने क्रिकेटपासून लांब होता. याचं कारण काय? तुम्ही त्याच्यावर काम करू शकता तसंच तुमच्या बॉलरवर बंदीची कारवाईही होत नाही. पाकिस्तानी खेळाडूवर बंदी आली तरी त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त पैशांची काळजी आहे,' असं सईद अजमल क्रिकविकशी बोलताना म्हणाला.

सईद अजमलने 2011 वर्ल्ड कप (World Cup 2011) सेमी फायनलवरही भाष्य केलं. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) अगदी सहज पराभव केला होता. वर्ल्ड कपच्या त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एलबीडब्ल्यू होता, पण डीआरएसमुळे तो वाचला, असंही अजमलने सांगितलं.

'अंपायरने तेंडुलकरला आऊट दिलं होतं. आजही अंपायर सचिन आऊट होता असंच सांगेल. याचा अर्थ स्पष्ट आहे. तुम्ही स्वत: डीआरएस पाहू शकता, तसंच कोणत्याही क्षणी बदलू शकता. मला त्याबाबत माहिती नाही, पण आजही मी तो बॉल बघितला किंवा अंपायरनेही बघितला तर बॉल स्टम्पला लागेल हे सांगू शकतो. डीआरएसमध्ये मात्र बॉल स्टम्पला लागत नसल्याचं दाखवण्यात आलं. हजारो लोकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले, पण मला अजूनपर्यंत त्याचं उत्तर मिळालं नाही,' अशी प्रतिक्रिया सईद अजमलने दिली.

First published:
top videos

    Tags: Cricket, R ashwin, Team india