नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहली कॅप्टन्सी सोडतोय त्यामुळे पूढील कॅप्टन कोण यावर सध्या क्रिकेट एक्सपर्टमध्ये चर्चा सुरू आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के एल राहुलचे (KL Rahul) नाव आघाडीवर आहे. अशातच माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहराने (Ashish Nehra) अचंबीत करणारे वक्तव्य करत टीम इंडियाचा नवा कॅप्टन एक उत्कृष्ट बॉलरदेखील होऊ शकतो असे म्हटले आहे.
टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहली कॅप्टन्सीपदावरुन पायउतार होणार आहे. त्यानंतर रोहित शर्मा, के एल राहुल, पंत हे खेळाडू कॅप्टन्सीपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहेत. मात्र, कॅप्टन्सीपदासाठी 42 वर्षीय नेहराने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पसंती दिली आहे.
बुमराह हा एकमेव खेळाडू आहे जो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे, तर केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना अनेकवेळा कोणत्या ना कोणत्यातरी फॉरमॅटमध्ये वगळण्यात आले आहे.
नेहराने क्रिकबझशी संवाद साधला. त्यावेळी त्याने टीम इंडियाच्या कॅप्टन्सीवर भाष्य केले. “रोहित शर्मानंतर आम्ही ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची नावे ऐकत आहोत. ऋषभ पंत संघासोबत जगभर फिरला आहे, पण मैदानावर ड्रिंक्सही घेऊन तो संघाबाहेर आहे. मयंक अग्रवाल जखमी झाल्यामुळे केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यामुळे जसप्रीत बुमराहला पर्याय असू शकतो.
अजय जडेजाने म्हटल्याप्रमाणे, तो मजबूत आहे, त्याचे स्थान निश्चित आहे आणि तो नेहमी तिन्ही फॉरमॅटच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असतो. वेगवान गोलंदाज कर्णधार होऊ शकत नाहीत, असे कोणत्याही पुस्तकात लिहिलेले नाही.असे नेहराने म्हटले आहे.
तसेच, 'मला कर्णधार न बनवून भारतीय संघाने आधीच मोठी चूक केली आहे. आता त्यांनी तीच चूक पुन्हा करू नये. असे गमंतीशीर वक्तव्यदेखील नेहराने यावेळी केले.
वृत्तानुसार, पुढील कर्णधारासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल दावेदारांमध्ये आघाडीवर आहेत. मात्र, बीसीसीआयने सध्या याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. पुढील आठवड्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे, त्यानंतर नव्या कर्णधाराचे नाव जाहीर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jasprit bumrah, Kl rahul, Rishabh pant, Rohit sharma, Virat kohli