Ashes : अत्तराच्या बाटलीत राख असेलली प्रतिष्ठेची ट्रॉफी, जाणून घ्या रंजक इतिहास

अॅशेस मालिका ही फक्त खेळ म्हणून नव्हे तर युद्धासारखीच खेळली जाते. याला स्पर्धेला 137 वर्षांचा इतिहास आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 07:13 AM IST

Ashes : अत्तराच्या बाटलीत राख असेलली प्रतिष्ठेची ट्रॉफी, जाणून घ्या रंजक इतिहास

कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी अॅशेस कसोटी मालिका 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 137 वर्षांचा इतिहास असलेली ही 71 वी मालिका आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने 33 तर इंग्लंडने 32 वेळा मालिका विजय साजरा केला आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी ही मालिका युद्धापेक्षा कमी नाही. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत 5 कसोटी खेळल्या जातात. अॅशेस जिंकल्यानंतर देण्यात येणारी ट्रॉफी फक्त 6 इंचांची आहे. या ट्रॉफीचा इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे.

1882 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत केलं होतं. हा पराभव इंग्लंडला इतका जिव्हारी लागला होता की प्रसार माध्यमांनीसुद्धा यावर कठोर शब्दांत टीका केली होती. स्पोर्टिंग टाईम्स या वृत्तपत्राने तर इंग्लंडच्या क्रिकेटचा मृत्यू झाला असंच म्हटलं होतं.

इंग्लंडच्या क्रिकेटवर अंत्यसंस्कार केले आणि त्याची राख ऑस्ट्रेलियाने नेली असं वृत्त देण्यात आलं होतं. त्यानंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा ती राख परत आणू असा विश्वास तत्कालिन कर्णधार इवो ब्लोगने संघ सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला.

तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी झाली होती. तिसऱ्या सामन्यात जिंकू किंवा मरू या इराद्याने खेळलेल्या इंग्लंडने विजय मिळवून गमावलेला आत्मसन्मान परत मिळवला.

Loading...

पराभवाची परतफेड केल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ब्लोगला एका महिलेनं अत्तराची बाटली ट्रॉफी म्हणून दिली. यामध्ये तिनं बेल्स जाळून त्याची राख भरली होती असं वृत्तही माध्यमांनी दिलं होतं.

इंग्लंडच्या कर्णधाराला ज्या महिलेनं ती ट्रॉफी दिली होती त्या फ्लोरेन्स मॉर्फीशीच 1884 मध्ये त्यानं लग्न केलं. ब्लोगच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सनं त्यांच्या प्रेमाचं प्रतिक असलेली ती ट्रॉफी 1929 मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लबला दिली. आजही अॅशेस ट्रॉफी संग्रहालयात असून विजेत्या संघाला प्रतिकृती दिली जाते.

1998-99 मध्ये क्रिस्टल ट्रॉफी विजेत्या संघाला देण्यास सुरूवात झाली. मूळ ट्रॉफी संग्रहालयातच ठेवली जाते. याआधी 1988 मध्ये आमि 2006-07 मध्ये ती ऑस्ट्रेलियाला नेण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 1, 2019 07:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...