'स्मिथ कितीही चांगला खेळलास तरी तुम तो धोकेबाज हो', क्रिकेटपटूनं केली टीका

'स्मिथ कितीही चांगला खेळलास तरी तुम तो धोकेबाज हो', क्रिकेटपटूनं केली टीका

ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्मिथनं बंदीनंतर पुनरागमन करताना 134 च्या सरासरीनं पाच सामन्यात 671 धावा केल्या आहेत.

  • Share this:

मँचेस्टर, 09 सप्टेंबर : अॅशेस मालिकेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणाऱ्या स्मिथवर इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसनने टीका केली आहे. हार्मिसनने लंडनमधील स्पोर्ट्स रेडिओ स्टेशन टॉल्क स्पोर्टशी चर्चा करताना स्मिथला जग कधीही माफ करणार नाही आणि त्याला दगाबाजी करणारा म्हणूनच लक्षात छेवलं जाईल.

हार्मिसनने म्हटलं की, स्मिथच्या त्या कृत्यासाठी त्याला कधीच माफ करणार नाही. मला नाही वाटत की स्मिथला माफ केलं जाईल. मी नेहमीच म्हटलं आहे की, जेव्हा तुम्ही फसवणूक करता त्याचा डाग नेहमीच तुमच्यावर लागतो. स्मिथनं जे केलं ते कायमस्वरुपी त्याच्या नावावर राहिल. जेव्हा तुम्ही गैरकृत्य करता त्याचा डाग मरेपर्यंत सोबत राहतो असंही हार्मिसन यांनी म्हटलं आहे.

स्मिथ, वॉर्नर, कॅमेरुन बॅनक्राफ्ट हे तिघेही गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चेंडूशी छेडछाड करताना दिसले होते. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथनं याची जबाबदारी घेत या प्रकरणाची कबुली दिली होती. स्मिथसोबत डेव्हिड वॉर्नरचाही यात हात होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं चौकशीनंतर तिनही खेळाडूंना दौऱ्यातून माघारी पाठवलं होतं. स्मिथ-वॉर्नर यांच्यावर 1 वर्षाची तर बेनक्राफ्टला 9 महिन्याच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं.

बंदीनंतर स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर यांनी वर्ल्ड कपमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. वॉर्नर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये वरच्या स्थानावर होता. स्मिथनं अॅशेस मालिकेत तीन शतकं आणि दोन अर्धशतकं केली आहेत. स्मिथनं 5 डावात 134 पेक्षा जास्त सरासरीनं 671 धावा केल्या आहेत. स्मिथनं मँचेस्टरमध्ये द्विशतकही केलं. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर चौथ्या कसोटीत विजय मिळवून अॅशेसवरही कब्जा केला.

राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन, 19 व्या ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव

SPECIAL REPORT: दापोलीचा मतदारसंघात शिवसेना मंत्र्याचा मुलगा मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या