ब्रिस्बेन, 1 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस सीरिजसाठी (The Ashes) इंग्लंडची टीम जोरदार तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाला धक्का देण्यासाठी इंग्लंडची टीम (Australia vs England) भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) व्हिडिओ पाहत आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती. यातल्या टीम इंडियाच्या रविंद्र जडेजाच्या कामगिरीवर इंग्लंडचा जॅक लिच (Jack Leach) प्रभावित झाला आहे. जॅक लिचने 16 टेस्टमध्ये 62 विकेट घेतल्या, पण त्याने अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियात एकही टेस्ट खेळलेली नाही. जडेजा भारतात जशी बॉलिंग करतो, त्यापेक्षा वेगळी रणनिती त्याने ऑस्ट्रेलियात वापरली, असं लिच म्हणाला. भारताने ऑस्ट्रेलियात मागच्या दोन सीरिज जिंकल्या आहेत, इंग्लंडही याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी इच्छुक आहे.
रविंद्र जडेजासोबतच जॅक लिच ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनची (Nathan Lyon) बॉलिंग बघूनही प्रभावित झाला आहे. 'अनेक वर्षांपासून मी नॅथन लायनला बघतोय, जिकडे खेळपट्टीवर बॉल स्पिन होत नाही, तिकडे अधिकचा बाऊन्स आणि इतर गोष्टींच्या मदतीने त्याने विकेट घेतल्या,' असं लिच म्हणाला.
'मलाही अशाच पद्धतींचा आपल्या बॉलिंगमध्ये समावेश करायचा आहे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. याचसोबत मी आपल्या मजबूत गोष्टींवरही कायम राहणार आहे,' अशी प्रतिक्रिया लिचने दिली आहे. इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) ऍशेससाठी फिट आहे, ज्यामुळे इंग्लंडची कामगिरी सुधारेल, असं लिचला वाटतंय. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजला 8 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.