Home /News /sport /

पाकिस्तानच नव्हे तर आम्हीही करू शकतो अशी 'कामगिरी'; ॲशेस सामन्यात इंग्लंडने दाखवून दिलं

पाकिस्तानच नव्हे तर आम्हीही करू शकतो अशी 'कामगिरी'; ॲशेस सामन्यात इंग्लंडने दाखवून दिलं

इंग्लंडकडे लक्ष्य गाठण्यासाठी पूर्ण अडीच दिवसांचा अवधी होता आणि संघाला विजयाचा दावेदार मानलं जात होतं. पण तिसऱ्या दिवशी संघ 124 धावांवर गारद झाला. महत्त्वाचे म्हणजे 68 धावांवर 1, 82 धावांवर 2 अशा स्थितीतून 124 धावांवर सर्वगडी बाद अशी इंग्लडची केविलवाणी अवस्था झाली.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 16 जानेवारी : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात खेळल्या जात असलेल्या अ‌ॅशेस मालिकेतील (ashes series) पाचवा सामना कांगारूंनी 146 धावांनी जिंकला. होबार्टमध्ये दोन्ही संघांमध्ये गुलाबी चेंडूची कसोटी खेळली जात होती. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी 271 धावा करायच्या होत्या. इंग्लंडकडे लक्ष्य गाठण्यासाठी पूर्ण अडीच दिवसांचा अवधी होता आणि संघाला विजयाचा दावेदार मानलं जात होतं. पण तिसऱ्या दिवशी संघ 124 धावांवर गारद झाला. महत्त्वाचे म्हणजे 68 धावांवर 1, 82 धावांवर 2 अशा स्थितीतून 124 धावांवर सर्वगडी बाद अशी इंग्लडची केविलवाणी अवस्था झाली. यावरून क्रिकेट रसिकांना पाकिस्तानची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. होबार्ट कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिका 4-0 ने जिंकली. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार मिळाला. इंग्लंडनं पुन्हा केली निराशा सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. रॉरी बर्न्स आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. कॅमेरून ग्रीननं बर्न्सला (26) बाद करून ही भागीदारी तोडली. दोन षटकांनंतर ग्रीननं डेव्हिड मलानचीही (10) विकेट घेतली. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची मैदानावर अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर एकाही इंग्रज खेळाडूला सूर गवसला नाही. क्राउली (36), कर्णधार जो रूट (11), बेन स्टोक्स (5) आणि सॅम बिलिंग्स (1) धावांवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात कर्णधार कमिन्स, स्कॉट बोलँड आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. एक विकेट मिशेल स्टार्कनं आपल्या खात्यात घातली हे वाचा - विमान प्रवास महागण्याची शक्यता, जानेवारीत दुसऱ्यांदा वाढले Aviation Turbine Fuel चे भाव ऑस्ट्रेलियाचा 34व्यांदा अ‌ॅशेसवर कब्जा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेलेली ही 72 वी अॅशेस मालिका होती. कांगारूंनी 34 व्यांदा इंग्लंडवर मात करत या किताबावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियानं सलग तिसऱ्यांदा अ‌ॅशेसवर कब्जा केला आहे. 2017/18 मध्येही कांगारूंनी 4-0 असा इंग्लंडचा पराभव केला. 2019 मध्ये खेळलेली ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. मालिका अनिर्णित राहिल्यानंतरही गतविजेता असल्यामुळं ऑस्ट्रेलियाला अॅशेसचा विजेता मानलं गेलं. यावेळीही कमिन्स अँड कंपनीनं ही मालिका 4-0 अशी जिंकली. हे वाचा - लाईट बिल भर नाहीतर जीव दे, डोक्याला बंदूक लावून सैनिकच करतायत वसुली कमिन्सनं घेतल्या सर्वाधिक विकेट अ‌ॅशेस सुरू होण्यापूर्वी, जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवण्यात आलं आणि त्यानं या मालिकेत कर्णधार आणि गोलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळ दाखवला. कमिन्सनं चार सामन्यांत 18 विकेट घेतल्या. ही मालिका त्याच्यासाठी खरोखरच संस्मरणीय ठरली. कमिन्सशिवाय नॅथन लायन (16) आणि मिशेल स्टार्क (15) यांनी बळी घेतले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, England

    पुढील बातम्या