मेलबर्न, 27 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस सीरिजमधील (Ashes Series) तिसरी टेस्ट मेलबर्नमध्ये सुरू आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या बॉलर्सनी जोरदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. त्यामुळे मेलबर्न टेस्टमधील रंगत वाढली आहे.
ऑस्ट्रेलियानं सोमवारी 1 आऊट 61 रनवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. ओली रॉबिन्सननं नाईट वॉचमन नॅथन लायनला आऊट केले. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ देखील झटपट परतले. ऑस्ट्रेलियाचा ओपनर मार्कस हॅरीसनं (Marcus Harris) या टेस्टमध्ये चांगला खेळ केला. त्याने सर्वाधिक 76 रन काढले. हॅरीसनं यापूर्वी जानेवारी 2019 मध्ये भारताविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर तब्बल 15 इनिंगनंतर त्यानं हा टप्पा ओलांडला आहे.
A fifty on his home ground for Marcus Harris 👏
Watch the #Ashes live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺 #AUSvENG | #WTC23 | https://t.co/QKpJv6yy6n pic.twitter.com/DkJ6Zjrjk6 — ICC (@ICC) December 27, 2021
हॅरीसचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचा अन्य कोणताही बॅटर अर्धशतक करू शकला नाही. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन (James Anderson) सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 4 विकेट्स घेतल्या. मार्क वूड आणि ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 2 तर बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
Australia are all out ☝️
They lead by 82 runs with England now having to counter a tricky hour of play. Watch the #Ashes live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#AUSvENG | #WTC23 | https://t.co/QKpJv6yy6n pic.twitter.com/jezoIxwIZP — ICC (@ICC) December 27, 2021
इंग्लंडची पहिली इनिंग 185 रनवर ऑल आऊट झाली होती. इंग्लिश बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 267 रनवर रोखलं. मोठी आघाडी घेण्याची यजमान टीमची योजना इंग्लिश बॉलर्सनी यशस्वी होऊ दिली नाही. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकल्या असून त्यांच्याकडे 2-0 अशी आघाडी आहे. तर ही सीरिज जिंकण्यासाठी इंग्लंडला उर्वरित तीन्ही टेस्ट जिंकणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.