मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series वर कोरोनाचे सावट, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन दुसऱ्या टेस्टमधून आऊट

Ashes Series वर कोरोनाचे सावट, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन दुसऱ्या टेस्टमधून आऊट

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजवर (Ashes Series) कोरोनाचं सावट पसरलं आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजवर (Ashes Series) कोरोनाचं सावट पसरलं आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजवर (Ashes Series) कोरोनाचं सावट पसरलं आहे.

मुंबई, 16 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजवर (Ashes Series) कोरोनाचे सावट पसरलं आहे. अ‍ॅडलेडमध्ये आजपासून (गुरूवार) सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) आऊट झाला आहे. कमिन्स बुधवारी रात्री हॉटेलमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. त्यामुळे तो दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही. कमिन्स अ‍ॅडलेडमधील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना हा प्रकार घडला.

कमिन्सला त्याच्या टेबलवरील व्यक्ती कोरोनानं संक्रमित असल्याचं समजतात त्याने तातडीने ते हॉटेल सोडले आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (Cricket Australia) या विषयाची कल्पना दिली. त्यानंतर कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असेल, असे जाहीर करण्यात आले. तर मिचेल नासेरचा (Michael Neser) प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. नासेरची ही पहिलीच टेस्ट आहे.

काय आला कमिन्सचा रिपोर्ट?

पॅट कमिन्सची नंतर कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याच रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती आहे.  तरीही त्याला खबरदारीचा उपाय म्हणून 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. कमिन्सने बायो-बबलचं उल्लंघन केलेलं नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. मेलबर्नमध्ये 26 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या टेस्टसाठी तो उपलब्ध असेल अशी आशा आहे.

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जोश हेजलवूड दुखापतीमुळे ही टेस्ट खेळणार नाही. त्यापाठोपाठ कमिन्सही या टेस्टमधून आऊट झाल्यानं यजमान टीमला धक्का बसला आहे. अनुभवी मिचेल स्टार्कसोबत झाय रिचर्डसन आणि मिचेल नासेर या नवोदीत बॉलर्सवर ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल.

IND vs SA : रोहित फिट झाला नाही तर कोण होणार वनडेचा कॅप्टन? या तिघांमध्ये रेस!

अ‍ॅडलेड टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाची Playing 11 :  डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, मिचेल नासेर, नॅथन लायन आणि झाय रिचर्डसन

First published:
top videos

    Tags: Ashes, Australia, Cricket, England