मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes : इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव, 140 वर्षातली सगळ्यात वाईट कामगिरी

Ashes : इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव, 140 वर्षातली सगळ्यात वाईट कामगिरी

ऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (Australia vs England 2nd Test) तब्बल 275 रननी पराभव केला आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे.

  • Published by:  Shreyas

ऍडलेड, 20 डिसेंबर : ऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (Australia vs England 2nd Test) तब्बल 275 रननी पराभव केला आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 468 रनचं आव्हान दिलं होतं, पण इंग्लंडची टीम 192 रनवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाने पहिली इनिंग 473/9 वर घोषित केली होती, यानंतर इंग्लंडला फक्त 236 रनच करता आले होते.

संधी असतानाही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉलो ऑन दिला नाही, त्यामुळे पुन्हा बॅटिंगला आलेल्या कांगारूंनी दुसरी इनिंग 230/9 वर घोषित केली आणि इंग्लंडला 468 रनचं कठीण आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड आधीपासूनच दबावात होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 82 रनच्या मोबदल्यात 4 विकेट गमावल्या होत्या. पाचव्या दिवशी कोणताही इंग्लिश बॅटर मैदानात टिकू शकला नाही. पहिल्या सत्राच्या ड्रिंक्स ब्रेकपर्यंत त्यांचा स्कोअर 105 रनवर 6 विकेट एवढा झाला होता.

इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स याने 3 रनवर पाचव्या दिवसाचा खेळ सुरू केला. दुसऱ्या बाजूला ओली पोप होता, पण पोपच्या रुपात इंग्लंडला पाचव्या दिवशी पहिला धक्का लागला. यानंतर 57 व्या ओव्हरला स्टोक्स 12 रनवर आऊट झाला. जॉस बटलरने क्रिस वोक्ससोबत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला, पण झाय रिचर्डसनने वोक्सला बोल्ड केलं. वोक्स 44 रन करून माघारी परतला, तर ओली रॉबिनसन 8 रनवर आऊट झाला. यानंतर जॉस बटलरही 26 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलरने त्याच्या या खेळीत तब्बल 207 बॉल खेळले.

इंग्लंडची लाजिरवाणी कामगिरी

इंग्लंडची या वर्षातली ही 14 वी टेस्ट होती, यातल्या 4 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर 8 सामने त्यांनी गमावले. 140 वर्षांमधल्या सगळ्यात खराब कामगिरीची इंग्लंडने बरोबरी केली आहे. इंग्लंड याआधी 4 वेळा एका वर्षात 8 टेस्ट हरली आहे. इंग्लंडने पहिली टेस्ट 1877 साली खेळली होती, यानंतर टीम 1984, 1986, 1993 आणि 2016 साली एका वर्षात 8 टेस्ट हरली.

ऍशेस सीरिजची तिसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्या टेस्टमध्येही जर इंग्लंडचा पराभव झाला, तर त्यांच्या नावावर या वर्षात सर्वाधिक 9 पराभवांची नोंद होईल.

First published:

Tags: Ashes