मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series: इंग्लंडचा शेवटचा प्रयत्न, मेलबर्न टेस्टसाठी टीममध्ये 4 मोठे बदल

Ashes Series: इंग्लंडचा शेवटचा प्रयत्न, मेलबर्न टेस्टसाठी टीममध्ये 4 मोठे बदल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) तिसरी टेस्ट रविवारपासून मेलबर्नमध्ये सुरू होत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) तिसरी टेस्ट रविवारपासून मेलबर्नमध्ये सुरू होत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) तिसरी टेस्ट रविवारपासून मेलबर्नमध्ये सुरू होत आहे.

मुंबई, 25 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series) तिसरी टेस्ट रविवारपासून मेलबर्नमध्ये सुरू होत आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमध्ये इंग्लंडची टीम सध्या 0-2 ने पिछाडीवर आहे. सीरिज गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लंडने बॉक्सिंग डे टेस्टसाठी (Boxing Day Test) टीममध्ये 4 बदल केले आहेत.

इंग्लंडनं पहिला बदल त्यांच्या ओपनिंग जोडीत केला आहे. या सीरिजमध्ये फ्लॉप ठरलेल्या रॉरी बर्न्सच्या जागी जॅक क्राऊलीची निवड करण्यात आली आहे. जॅकसाठी देखील हे वर्ष निराशाजनक ठरले आहे. त्याने 7 टेस्टमध्ये फक्त 11.14 च्या सरासरीनं रन केले आहेत. 6 व्या क्रमांकावर बॅटींगला येणाऱ्या ओली पोपला वगळण्यात आले असून त्याच्या जागी जॉनी बेअरस्टोचा समावेश करण्यात आला आहे. बेअरस्टोनं मेलबर्नमध्ये यापूर्वी 2 टेस्ट खेळल्या आहेत. हा अनुभव लक्षात घेऊन त्याची या टेस्टसाठी निवड करण्यात आली आहे.

त्याशिवाय ऑल राऊंडर ख्रिस वोक्सच्या जागी मार्क वूडला संधी देण्यात आली आहे. वोक्सनं या सीरिजमध्ये बॉलर म्हणून निराशा केली आहे. तर अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडला वगळण्यात आले असून त्याच्या जागी जॅक लिच या स्पिनरची टीममध्ये एन्ट्री झाली आहे.

मुंबईकर 'सूर्या' तळपला, 42 बॉलमध्ये काढले 178 रन! दक्षिण आफ्रिकेचे तिकीट निश्चित

मेलबर्न टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 : हसीब हमीद, झॅक क्राऊली, डेव्हिड मलान (कॅप्टन), जो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मार्क वूड, ओली रॉबिन्सन, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन

First published:
top videos

    Tags: Ashes, Australia, Cricket news, England